पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरामध्ये असलेल्या IMDb च्या कोट्यवधी ग्राहकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे 2024 मधील सर्वांत प्रतीक्षा असलेला भारतीय चित्रपट म्हणून फायटर घोषित करण्यात आला आहे. IMDb ने आज २०२४मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय चित्रपटांची घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या –
फायटर (२०२४ मधील क्र. १ चा सर्वाधिक प्रतीक्षा असलेला चित्रपट) मध्ये मुख्य भूमिकेमध्ये असलेल्या अभिनेता हृतिक रोशनने म्हटले, "आयएमडीबीनुसार २०२४ मधील सर्वांत प्रतीक्षा असलेल्या भारतीय चित्रपटांमध्ये फायटर क्र. १ स्थानी आहे, ही अतिशय सकारात्मक आणि विशेष बातमी आहे. फायटरच्या टीजर आणि गाण्यांना मिळालेला प्रतिसाद अतिशय विलक्षण आहे आणि २५ जानेवारी २०२४ रोजी आमच्या प्रेक्षकांना अतिशय वेगळा सिनेमाटीक अनुभव मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. या प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला चित्रपटगृहांमध्ये भेटूया!"
फायटर
पुष्पा: द रूल – पार्ट २
वेलकम टू द जंगल
सिंघम अगेन
कलकी २८९८ एडी
बघीरा
हनूमान
बडे मियाँ छोटे मियाँ
कांगुवा
देवरा पार्ट 1
छाया
गुंटूर कारम
मलाईकोट्टाई वालीबन
मेरी ख्रिसमस
कॅप्टन मिलर
थंगालान
इंडियन २
योद्धा
मै अटल हूँ
जिगरा
IMDb यादीमधील या २० शीर्षकांपैकी नऊ हिंदी चित्रपट आहेत. पाच तेलुगू चित्रपट आहेत, चार तमिळ, एक मल्याळम आणि एक कन्नड चित्रपट आहे, हे विशेष आहे. फायटर (क्र. १), सिंघम अगेन (क्र. ४), आणि कल्की २८९८ एडी (क्र. ५). अलीकडेच घोषित झालेल्या २०२३ च्या आयएमडीबी सर्वात प्रसिद्ध भारतीय अभिनेत्यांच्या यादीमध्येही दीपिका पदुकोन तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. या यादीमधील चार चित्रपट बहुप्रतीक्षेत आहेत. पुष्पा: द रूल – पार्ट २ (क्र. २), वेलकम टू द जंगल (क्र. ३), सिंघम अगेन (क्र. ४), आणि इंडियन २ (क्र. १७).