Vijay Devarakonda-Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा साखरपुडा करणार?

vijay-rashmika
vijay-rashmika
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विजय देवरकोंडा आणि ॲनिमल फेम रश्मिका मंदाना पुढील महिन्यात साखरपुडा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये खूप क्लोज बॉन्ड आहे. (Vijay Devarakonda-Rashmika Mandanna ) दोघांमधील मैत्रीदेखील सर्वश्रृत आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री सर्वांनाच माहिती आहे.

संबंधित बातम्या –

रश्मिका आणि विजय पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये साखरपुडा करू शकतात, असे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप या दोन्ही स्टार्सकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रश्मिका आणि विजयच्या साखरपुड्याचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अनेकदा रश्मिका मंदाना आणि साऊथ स्टार विजय देवरकोंडा दोघंही एकत्र स्पॉट झाले आहेत. मध्यंतरी दोघांनीही एकाच प्रकारचे कपडे परिधान केल्याचे समोर आले होते. त्यांनी आपण केवळ मित्र असल्याचेही म्हटले होते.

रश्मिकाने या साऊथ अभिनेत्याला केलं होतं डेट

रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना याआधी साऊथचा प्रसिद्ध स्टार रक्षित शेट्टीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. अभिनेत्री रश्मिकाने त्याच्यासोबत साखरपुडादेखील केल्याचे म्हटले जात होते. पण, काही कारणांनी दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.

रश्मिकाचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ॲनिमल चांगलाच गाजला. तिने रणबीर कपूरसोबत चित्रपटात अभिनय केला होता. ॲनिमलने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

आता रिपोर्टनुसार, नेटकरी, त्यांचे फॅन्स त्यांच्या रिलोशनशीपबद्दल बोलत आहेत आणि दोघेही लवकरच साखरपुडा करतील, असे म्हटले जात आहे. (Vijay Devarakonda-Rashmika Mandanna)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news