Body Shaming : डबल एक्सएल हुमा आणि सोनाक्षी

Body Shaming : डबल एक्सएल हुमा आणि सोनाक्षी

पुढारी ऑनलाईन

हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट 'डबल एक्सएल' हा बॉडी शेमिंगवर आधारित असलेला एक कॉमेडी चित्रपट आहे. शारीरिक वजनाबाबतचे पारंपरिक साचेबद्ध विचार यावर विनोदी अंगाने यात प्रकाश टाकला आहे. सतराम रामानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विनोदातून सामाजिक बदलांची पेरणी करणारा हा चित्रपट आहे, असे हुमा म्हणते. यात हुमाने मीरतमधील राजश्री त्रिवेदी आणि सोनाक्षीने दिल्लीतील सायरा खन्‍ना ही भूमिका साकारली आहे. याचवर्षी हा चित्रपट रीलिज होऊ शकतो.

दरम्यान, हुमाची वेबसीरिज 'मिथ्थ्या'नुकतीच झी फाईव्हवर रीलिज झाली आहे. याशिवाय तमिळ सुपरस्टार अजितच्या 'वलीमाई'मध्येही हुमा आहे. याशिवाय नेटफ्लिक्सच्या 'मोनिका, ओ माय डार्लिंग'या चित्रपटात आणि सोनी लिव्हवरील 'महाराणी'या वेबसीरिजच्या दुसर्‍या सीझनमध्येही ती दिसणार आहे. सोनाक्षी आगामी काळात महेशबाबूसोबत 'शिवम' या चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news