'हिट ३' - 'रेट्रो' चित्रपटांचा विकेंडला बॉक्स ऑफिसवर परफॉर्मन्स कसा राहिला ? नेमकी कमाई किती ?

HIT 3-Retro Weekend Performance : जाणून घेऊया विकेंडला या चित्रपटांचा परफॉर्मन्स कसा?
Hit 3 Retro box office performance
HIT 3-Retro Movie Performancefile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील आठवड्यात 'रेड २' आणि 'द भूतनी' या बॉलिवूड चित्रपटांसोबतच, 'हिट ३' आणि 'रेट्रो' हे दोन दक्षिण भारतीय चित्रपटही चित्रपटगृहात दाखल झाले. चौथ्या दिवशी म्हणजेच विकेंडला दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली हे माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया विकेंडला या चित्रपटांचा परफॉर्मन्स कसा झाला.

१ मे रोजी चित्रपटगृहात एकाच वेळी चार चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये दोन बॉलिवूड तर दोन साऊथच्या चित्रपटांचा समावेश होता. सध्या 'रेड २' हा बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तर, 'द भूतनी' चा प्रवास चित्रपटगृहात संपताना दिसत आहे. साऊथ चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास नानीच्या 'हिट ३' ची सुरुवात चांगली झाली. सूर्याच्या 'रेट्रो'नेही पहिल्या दिवशी चांगली कमाई केली.पण विकेंडची आकडेवारी पाहता या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

'हिट ३' ने कमावले किती ?

नानी आणि श्रीनिधी शेट्टी स्टारर 'हिट ३' हा फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी २१ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशीच त्याच्या कमाईत मोठी घसरण झाली आणि पहिल्या दिवसाच्या तुलनेत कलेक्शन फक्त निम्मे झाले. 'हिट ३' ने दुसऱ्या दिवशी १०.५ कोटी रुपये कमावले.

Hit 3 Retro box office performance
Babil Khan : सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट डिलिट केल्याने इरफानचा मुलगा चर्चेत, आईने केला खुलासा.. नेमकं काय आहे प्रकरण

शनिवारी, तिसऱ्या दिवशी, 'हिट ३' ने १०.४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याच वेळी, रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी घट झाली आहे. या चित्रपटाला विकेंडचा फायदा मिळाला नाही. चौथ्या दिवशी, त्याने फक्त ७.६७ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचा एकूण व्यवसाय ४९.५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच चित्रपटाला चार दिवसांत ५० कोटी रुपयेही कमाई करता आलेले नाही.

'रेट्रो'चीही कमाई घसरली

सूर्या, पूजा हेगडे आणि प्रकाश राज यांच्या 'रेट्रो' चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी १९.२५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.७५ कोटी रुपये कमावले. शनिवारी तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन ८ कोटी रुपये होते. चौथ्या दिवशी, रविवारी, चित्रपटाचे कलेक्शन ६.९६ कोटी रुपये होते. 'रेट्रो' चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन फक्त ४१.९६ कोटी रुपये इतकेच झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news