

Babil Khan
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान अलीकडेच एका भावनिक व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. ज्यामध्ये त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल नाराजी व्यक्त करत काही कलाकाराबाबत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्याने ती पोस्ट डिलिट केली. यामुळे चाहत्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
याबाबत त्याची आई लेखिका सुतापा सिकदर यांनी रविवारी (दि.४) इंस्टाग्रामवर एक अधिकृत पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. त्या व्हिडिओबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, बाबिलच्या व्हिडिओतील भावना चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत. बाबिलने ज्यांची नावे घेतली, त्यांच्याबद्दल त्याला खरोखरच आदर आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपूर्वी बाबील आपल्या अभियानाबद्दल आणि मानसिक आरोग्याबद्दल आपल्या चाहत्यांशी उघडपणे बोलल्याने चाहत्यांनी त्याला आदर दिला होता. प्रत्येक माणसांप्रमाणे बाबीलही कठीण प्रसंगातून जात आहे. त्याच्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, तो सुरक्षित असून लवकरच पुर्णपणे बरा होईल.
काही दिवसांपूर्वी बाबिल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्याबद्दल असा दावा केला जात होता की, बाबिलने स्वतः तो सकाळी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता आणि नंतर तो डिलीट केला होता.
या व्हिडिओमध्ये बाबिलने अनन्या पांडे आणि अर्जुन कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकारांना फेक असे म्हटले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबिलने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आणखी संभ्रम वाढला होता.
बाबिलला सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला, तर काहीजणांनी त्याला ट्रोल केले होते. या प्रकरणावर अद्याप अनन्या पांडे, अर्जुन कपूर किंवा इतर स्टार्सकडून कोणतेही विधान आलेले नाही.