Hindi-South Big budget movies clash| बॉलिवूडचे 'धुरंधर' Vs दक्षिणेतील 'कुली', 'कांतारा'; पुढील सहा बॉक्स ऑफिसवरील 'वॉर' कोण जिंकणार?
मुंबई : पुढील काही महिन्यांत मोठ्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश असेल, ज्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपट इंडस्ट्रीत संघर्षाची सुरुवात होणार, असे म्हणता येईल. चित्रपट निर्माते आणि ट्रेड विश्लेषकांनी याबाबत म्हणणे मांडले आहे.
दक्षिणेतील आगामी चित्रपट
कुली (तमिळ), कांतारा: चॅप्टर १ (कन्नड) आणि द राजा साब (तेलुगू) हे तीन मोठे दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा हिंदी चित्रपटांच्या जवळच आहेत. बॉलीवूड चित्रपट 'वॉर २', 'इक्किस', 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि 'दुरंधर' यांच्याशी या तारखांचा क्लॅश होईल. हे बिग बजेट चित्रपट असून प्रत्येक चित्रपटाचे अंदाजे बजेट १५०-४०० कोटी आहे.
२०२५ मध्ये बॉलिवूडला सैयारा चित्रपटामुळे मोठे यश मिळाले. १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेला सैयारा २५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज आहेत. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच हिंदी आणि साऊथ चित्रपटांच्या रिलीज डेट जवळपास क्लॅश होणार आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांचा परिणाम हिंदी चित्रपटांवर?
निर्माता, चित्रपट व्यवसाय तज्ज्ञ गिरीश जौहर म्हणाले, "महामारीनंतर, प्रादेशिक आणि हिंदी चित्रपटांमधील रेषा अस्पष्ट झाली आहेत. आज प्रेक्षकांना उत्तम कंटेंट हवाय. म्हणून, जर संपूर्ण भारतातील प्रेक्षकांसाठी एखादा जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट असेल तर त्याचा परिणाम हिंदी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस क्षमतेवर होऊ शकतो."
बॉलीवुड निर्माते नेहमी दक्षिणी चित्रपटांसोबत सामना होऊ नये, याची काळजी घेतात. कारण दक्षिणी चित्रपटातील आवडत्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी हिंदी पेक्षा अधिक त्यांना प्राधान्य देतात. व्यापार तज्ज्ञांच्यानुसार, दक्षिणेचा एक ब्लॉकबस्टर पॅन इंडिया चित्रपट, एखाद्या प्रतिस्पर्धी हिंदी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील क्षमतेला १० ते २० टक्क्यांनी कमी करू शकतात.
कार्मिक फिल्म्सचे सहसंस्थापक आणि दिग्दर्शक सुनील वाधवा म्हणाले, "जेव्हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होतात, तेव्हा बॉक्स ऑफिसवरील परिणाम पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा खूपच अधिक असतो. स्क्रीन शेअर केले जातात. शो टाईमचे प्रमाण कमी असल्याचे आश्वासन दिले जाते. फक्त एकट्या उत्तर भारतात चित्रपटांतील क्लॅशमुळे प्रत्येक चित्रपटाच्या महसुलात २०-४० कोटींचे नुकसान होऊ शकते."
डिजिटल, सॅटेलाईट आणि परदेशातील चित्रपटांच्या हक्कांमधून मिळणाऱ्या महसुलावरही परिणाम होऊ शकतो, असे वितरकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून मोठ्या बजेटचे हिंदी वा दक्षिण भारतीय चित्रपट वेगवेगळ्या तारखांना प्रदर्शित करण्याचा ते सल्ला देतात.
ते पुढे म्हणाले, "योग्य वेळी एकच रिलीज बॉक्स ऑफिसवर असणे उत्तम आहे. एक चित्रपट ३०० कोटींची हिट ते ५०० कोटींचा ब्लॉकबस्टर ठरू शकतो."
काय म्हणतात ट्रेड ॲनालिस्ट
कमिने आणि आदिपुरुषचे निर्माते राजेश आर नायर म्हणाले, "व्यवसायासाठी संघर्ष हे नेहमीच वाईट असतात. दाक्षिणात्य चित्रपट चांगले प्रदर्शन करत आहेत. कांतारा: चॅप्टर १ चित्रपट बहुप्रतीक्षित सिक्वेलपैकी एक आहे.'' रजनीकांत यांच्या 'कुली' आणि प्रभासच्या 'द राजा साब' हे हॉरर-कॉमेडी चित्रपट बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देतील, असे त्यांना वाटते.
काही व्यापार विश्लेषकांना असे वाटते की, या चित्रपटांच्या प्रदर्शनाची वेळ जमेची बाजू ठरु शकते. कारण हे चित्रपट सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित केले जातील, जेव्हा चित्रपटगृहांमध्ये गर्दी जास्त असते. तसेच, ट्रेड ॲनालिस्ट गिरीश वानखेडे म्हणतात- ''हे प्रतिस्पर्धी चित्रपटाचा कंटेंटच चित्रपटांना टिकवू शकेल. करण या चित्रपटांचे प्रकार वेगळे आहेत."
सैयाराचे यश चांगले असले तरी, थिएटरमध्ये सुपरमॅन, जुरॅसिक वर्ल्ड: रिबर्थ आणि द फॅन-टॅस्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स सारख्या हॉलिवूड चित्रपटांचेही उल्लेखनीय योगदान उत्तम आहे. भारतीय चित्रपटांव्यतिरिक्त, झूटोपिया २ आणि अवतार: फायर आणि अॅश यासारखे हॉलिवूड चित्रपट देखील २०२५ मध्ये प्रदर्शित होतील.

