

सेलिब्रिटीच्या पाठी वेडे असलेल्या फॅन्सचे किस्से किंवा व्हीडियो सतत समोर येत असतात. विशेषत: सेलिब्रिटींच्या मनाविरुद्ध सेल्फी किंवा व्हीडियो काढणाऱ्या फॅन्सवर भडकलेल्या सेलिब्रिटींचे किस्सेही प्रसिद्ध आहेत. अनेकदा अशा घटना जया बच्चन यांच्यासोबत सतत घडत असतात. (Latest Entertainment News)
पण यावेळी एक हटके घटना समोर आली आहे. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सेल्फी घेणाऱ्या चाहतीसोबत असे की केले की हा व्हीडियो व्हायरल होताच नेटीझन्सनी त्यांच्या वागण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
हेमामालिनी एक नवरात्र इव्हेंटमध्ये पोहोचल्या होत्या. त्यावेळी एका चाहतीने हेमामालिनी यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हेमा यांनी चेहऱ्यावर नाराजीचे भाव आणत तोंड फिरवले. त्यांची अशी रिएक्शन पाहताच अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
भारतीय सिनेमातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हेमामालिनी यांचे नाव प्रख्यात आहे. अर्थातच त्यांचे फॅन फॉलोविंगही खूप आहे. पण एखाद्या फॅन्सशी त्यांचे असे वागणे चाहत्यांना बिलकुल आवडलेले दियात नाही. या व्हीडियोच्या कमेंटमध्ये काहींनी हेमा मालिनी यांना ट्रोल केले आहे तर काहींनी त्या सेल्फी घेणाऱ्या सुनावले आहे. काहीनी त्या सेल्फी घेणाऱ्या महिलेला म्हणाले आहे की इतका अपमान सहन करून का सेल्फी घ्यायचा आहे? ही काही स्वाभिमान आहे की नाही? तर एका युजरने हेमामालिनी यांचे वागणे न आवडून लिहिले आहे की, याना कशाची घमेंड आहे एवढी? यांच्यापेक्षा रेखाजी खूप बऱ्या आहेत. त्या किती कुल आहेत.’ दूसरा म्हणतो, या खूप घमेंडी आहेत. मी त्यांचे व्हीडियो पाहिले आहेत. तर एकजण म्हणतो, यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या तरी घमेंड आहे.
यापूर्वीही हेमामालिनी यांचा एक व्हीडियो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हेमा यांना एका महिलेचा चुकून स्पर्श झाला होता. त्यावेळी त्या महिलेलवर भडकल्या होत्या. या व्हीडियोनही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.