

अलीकडेच करण कुंद्रा आणि त्याची एक्स अनुशा दांडेकर सध्या चर्चेत आहेत. जे माजी कपल अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे या दोघांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनत आहेत. (Latest Entertainment news)
2020 मध्ये या दोघांचे ब्रेक अप झाले होते. पण अलीकडेच अनुशाने करणवर गंभीर आरोप केले होते. अनुशाने करणवर फसवणुकीचा आरोप केला होता. तिचा एक व्हीडियो या दरम्यान व्हायरल होतो आहे. यामध्ये ती करणचे नाव न घेता म्हणते की ती ज्याला डेट करत होती. तो व्यक्ति डेटिंग अॅपच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुलींना डेट करत होता. त्यावरून सगळ्यांनी अनुमान लावले आहे की ती करणबाबत बोलत आहे.
करणने या दरम्यान पहिल्यांदाच मौन सोडले आहे. त्याने एक इंस्टा स्टोरी पोस्ट केली होती जी त्याने नंतर डिलीट केली. तीन तासात 87 आर्टिकल कशासाठी? एक पॉडकास्टसाठी? हे देशातील युवकांमध्ये प्रेरणादायी ठरेल का? हे तुमच्यासाठी मनोरंजन आहे का? हे दुर्दैवी आहे की काही क्रूर पण एलिट महिला काहीही बोलतात आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. माझ्या सारख्या पुरुषाला अशावेळी कोणताही सपोर्ट मिळत नाही. आम्ही छोट्या शहरातून येतो. खूप मेहनत करतो. घरातल्यांपासून लांब राहतो. पण आम्हाला कोणी सपोर्ट करत नाही.
करण पुढे म्हणतो की सकाळी चार वाजता त्याने ही पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो, कोणतीही महिला जिचे कनेक्शन बॉलीवुड कुटुंबाशी आहे. जी कोणत्याही पुरुषावर काहीही आरोप करू शकते आणि कोणी तिला त्याचा जाबही विचारणार नाही. त्याने या आरोपांना छळ असे समजले आहे. असे आरोप कोणत्याही व्यक्तीला आतून तोडू शकतात.
सध्या करण तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. करण आणि तेजस्वीची लव्हस्टोरी बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये सुरू झाली. ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या अनेकदा चर्चा होत असतात.