

रिशभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टरने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर गर्जना केली आहे. या प्रीक्वेल सिनेमाने 60 कोटींचा गल्ला जमवला आहे. विजयादशमीचा मुहूर्त साधत या सिनेमाने प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात यश मिळवले आहे. हा सिनेमा ओपनिंगला 40 – 50 कोटी कमावेल इतके बोलले जात होते. पण या सगळ्या शक्यतांना मागे सारून कांतारा 1 ची यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे. (Entertainment latest News)
या सिनेमाने पवन कल्याणच्या ‘दे कॉल्ड हिम ओजी’ आणि रजनीकांतच्या ‘कुली’नंतर 2025 मध्ये सगळ्यात मोठी ओपनिंग दिली आहे. या सिनेमाच्या हिन्दी व्हर्जननेदेखील दमदार गल्ला गोळा केला आहे.
2025च्या सगळ्यात मोठ्या ओपनिंगच्या यादीत कुली आणि ‘दे कॉल्ड हिम ओजी’नंतर कांतारा तिसऱ्या नंबरला आहे. तर हिन्दी व्हर्जनमध्ये पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये हा सिनेमा सहाव्या नंबरला आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार कांताराने पहिल्या दिवशी 5 भाषांतील रिलीज मिळून 60 कोटींचे ओपनिंग केले आहे.
यात सगळ्यात जास्त कमाई 19.5 कोटींची आहे जी हिन्दी व्हर्जनमध्ये आहे.
तर मातृभाषा कन्नडमध्ये या सिनेमाने 18 कोटी कमावले आहेत.
तर या सिनेमाच्या तेलुगू व्हर्जनने 12.5 कोटी कमावले आहेत
तमिळमध्ये 5.25 कोटी आहे.
मल्याळममध्ये या सिनेमाने 4.75 कोटी रुपये कमावले आहेत.
कांतारा 1 ने हिन्दीमधील 19.5 कोटी रुपये कमावले आहेत. हिन्दीतील रिलीजपूर्वीच या सिनेमाच्या अडव्हॅन्स बुकिंगमध्येच 3.80 कोटी रुपये कमावले होते. आता येत्या वीकएंडला या सिनेमाच्या कमाईमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.
हिन्दीमध्ये सगळ्यात जात ओपनिंग असलेल्या सिनेमांमध्ये छावा, वॉर 2, सिकंदर, हाऊसफूल 5, आणि सैय्यारा हे आहेत. आता सहाव्या नंबरला कांतारा आहे.