Dipika Kakar Health | 'अजुनही वेदनादायी'; हालचाल करताना दीपिकाला सहन करायला लागताहेत या समस्या
दीपिका काकरने तिच्या प्रकृतीबाबत खुलासा करत सांगितलं की, अजूनही काही हालचाली करताना तिला वेदना जाणवतात. पूर्णपणे बरी न झाल्याचं तिने मान्य केलं असून सध्या ती काळजी घेत आहे. तिच्या या अपडेटनंतर चाहत्यांनी तिच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली आहे.
dipika kakar health update painful movement issues
सिस्ट रिमूव्हल सर्जरीनंतर घरी परतताना दीपिका कक्करने तिच्या प्रकृतीबाबत माहिती शेअर केलीय. ती म्हणते- ‘मी हालचाल करताना अजूनही वेदना जाणवत आहेत.’ सिस्ट रिमूव्हल सर्जरीनंतर घरी परतताना दीपिका कक्करने एक व्लॉग शेअर केलाय. कठीण काळात तिच्यासाठी फॅन्सनी केलेल्या प्रार्थना आणि पाठिंबा दिल्याबद्दल तिने आभार मानले आहेत.
गेल्या वर्षी लिव्हर कॅन्सरचे तिला निदान झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरु झाले होते. आता एका नवीन आरोग्याची समस्या तिला उद्भवली. तिच्या लिव्हरमध्ये १.३ सेमीचा सिस्ट असल्याचे निदान झाले आणि ती काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन दिवसांनंतर ती अखेर घरी आली आहे. तिने आता तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली.
काय म्हणाली दीपिका?
शस्त्रक्रियेनंतर ती भावूक झाली. तिला "असह्य वेदना" सहन कराव्या लागल्याचे तिने म्हटले आहे. ती म्हणाली की, शस्त्रक्रियेआधी ती खूप घाबरली होती आणि चिंतेत होती. तिला अश्रू अनावर झाले होते. शुद्धीवर आल्यानंतर तिला तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या.
शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी दीपिका घरी परतली आहे. ती म्हणाली- "शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली, पण काल रात्री आम्ही घरी परतलो. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली.''
मी खूप रडत होते. डॉक्टरांनी मला शांत केले. यावेळी, प्रक्रिया ओटीमध्ये नव्हती; ती सीटी रूममध्ये होती. ही आरएफए नावाची प्रक्रिया आहे, जिथे त्यांनी माझे सिस्ट जाळले आणि ते खूप लहान असल्याने, ते अशा प्रकारे प्रक्रिया पार पडली. जर ते मोठे असते तर प्रक्रिया अधिक कठीण झाली असती."

