rashmika vijay marriage pics: 'मी तुझ्यावर पुस्तक...', लग्नानंतर रश्मिकाची पोस्ट; विवाहसोहळ्याचे फोटो समोर

Rashmika Mandanna vijay deverakonda marriage: लग्नानंतर रश्मिका आणि विजयने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
rashmika mandanna vijay deverakonda wedding photo
rashmika mandanna vijay deverakonda wedding photoPudhari
Published on
Updated on

Rashmika Mandanna vijay deverakonda wedding News

उदयपूर : अभिनेत्री रश्मिक मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा गुरुवारी विवाहबद्ध झाले. 'Mr. Husband’ असा उल्लेख करत रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहे. ‘या माणसावर मी एखादं पुस्तक लिहू शकते', असंही रश्मिकाने म्हटले आहे. तर 'मी आज माझ्या जीवलग मैत्रिणीसोबत लग्न केले', असं सांगत विजयने रश्मिकाची ओळख करुन दिली.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे विवाहबद्ध झाले. अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेल्या द मेमेंटोज या आयटीसीच्या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या फोटोबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकताही होती. संध्याकाळी सहाच्या सुमारास रश्मिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फोटो शेअर केले आहेत.

रश्मिकाने पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

रश्मिका पोस्टमध्ये म्हणते, 'मी आज तुम्हा सर्वांना माझा नवऱ्याची विजय देवरकोंडाची ओळख करुन देते. ज्याने मला खरं प्रेम कसं असतं हे शिकवलं…ज्याने मला मन:शांती म्हणजे नेमकं काय असतं हे जाणवून दिलं.. ज्याने मला रोज सांगितलं की मोठी स्वप्नं पाहायला हवीत, आणि जो सतत मला आठवण करून देत राहिला की मी खूप मोठं साध्य करू शकते.. ज्याने मला कधीही “कोणी बघतंय का?” याची पर्वा न करता मनसोक्त नाचण्यापासून थांबवलं नाही… ज्याने मला मित्रांसोबत फिरणं ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे हे शिकवलं… आणि खरंच, या माणसाबद्दल मी एखादं संपूर्ण पुस्तक लिहू शकते…'

rashmika mandanna vijay deverakonda wedding photo
Aamir Khan met Salim Khan | सलीम खान यांच्या तब्येतीबद्दल आमिरची मोठी अपडेट! नेमकं काय म्हणाला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’?

विजय देवरकोंडाने पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

विजय देवरकोंडानेही इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहे. विजय म्हणतो, 'एक दिवस… मला तिची खूप आठवण आली. ती माझ्यासोबत असती तर माझा दिवस कितीतरी चांगला गेला असता असं मला त्या दिवशी वाटत होतं. ती माझ्यासोबत असती तर वर्कआउटही शिक्षा न वाटता मजेशीर झालं असतं असं वाटलं. तिच्यामुळे मला घर आणि शांतता याची जाणीव झाली. म्हणूनच मी माझ्या जीवलग मैत्रिणी लग्न केले.'

नुकतंच रश्मिका आणि विजयने प्रेमाची कबुली देत लग्न करत असल्याची घोषणा केली होती. या जोडीला चाहत्यांनी दिलेले 'विरोश' हे कपल नाव दोघांनी वेडिंग टायटल म्हणून स्वीकारले
होते. 2017 मध्ये गीता गोविंदम या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान रश्मिका आणि विजय पहिल्यांदा भेटले होते. सुरुवातीला रश्मिका विजयला बघून घाबरत होती. पण शुटिंगदरम्यान दोघांमधील मैत्री घट्ट झाली. जानेवारी 2023 पासून दोघंही डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

rashmika mandanna vijay deverakonda wedding photo
Bhagyashree Milind: मराठी भाषादिनाच्या आधी थोडंसं.. डोंबिवलीत मराठी बोलल्यावर ‘ओन्ली हिंदी’ बोललं जातंय; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

नोव्हेंबर 2024 मध्ये विजयने पहिल्यांदा कबुली दिली

नोव्हेंबर 2024 मध्ये विजयने पहिल्यांदाच रिलेशनशिपचं स्टेटस काय याचं उत्तर दिले होते. त्याने रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं असलं तरी नाव उघड केले नव्हते. यानंतर रश्मिका विजयच्या कुटुंबातील एका सदस्यासोबत चित्रपट गृहातून बाहेर पडताना दिसली होती. 3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादमध्ये दोघांनी साखरपुडा केल्याचे वृत्त होते. या साखरपुड्यात अत्यंत मोजकी मंडळीच उपस्थित होती, असंही सांगितलं गेलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news