Battle of Galwan New Song | सलमान-चित्रांगदाच्या नव्या गाण्यात रोमँटिक ट्विस्ट, एका तासात 138,231 व्ह्यूज (व्हिडिओ)

Battle of Galwan New Song | सलमान-चित्रांगदाची केमिस्ट्री तर अफलातूनच, तासात 138,231 व्ह्यूज (व्हिडिओ)
image of salman khan - chitrangda singh
Battle of Galwan New Song main hoon released instagram
Published on
Updated on
Summary

‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील नव्या गाण्याने रिलीज होताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सलमान खान आणि चित्रांगदा सिंग यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे गाणं विशेष चर्चेत आलं असून एका तासात 1,38,231 व्ह्यूज मिळवत ते ट्रेंडिंगमध्ये झळकत आहे.

New Song of "Battle of Galwan" is Out Now

बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपट Battle of Galwan सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतंच या चित्रपटातील एक रोमँटिक गाणं 'मैं हूं' प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून रिलीज होताच त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात Salman Khan आणि Chitrangda Singh यांची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

image of salman khan - chitrangda singh
O Romeo BO Collection : कमालीची स्टोरी..तृप्ती डिमरी-शाहिद कपूरच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद, ओपनिंग डेचा गल्ला किती?

देशभक्तीच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात रोमँटिक अँगल दाखवणारे हे गाणं प्रेक्षकांना भावनिक आणि आकर्षक वाटत आहे. सुंदर लोकेशन्स, सुंदर म्युझिक आणि दोन्ही कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे बॅटल ऑफ गलवान एक्स हँडलवर ट्रेंडवर आहे.

या गाण्याचं म्युझिक आणि बोलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. देशभक्ती आणि प्रेम या दोन्ही भावना एकत्र या गाण्यातून दिसून येत आहेत. गाणे रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका तासात या गाण्याला 1,38,231 व्ह्यूज मिळाले आहेत. इतक्या कमी वेळात मिळालेल्या या प्रतिसादामुळे गाणं ट्रेंडिंग लिस्टमध्ये झळकू लागलं आहे.

image of salman khan - chitrangda singh
Valentine's day | No Proposal, No Drama! गुपचूप वाढलं प्रेम, थेट हिमाचलमध्ये लग्न, Aditya Dhar-Yami Gautam ची खास प्रेमकहाणी

या चित्रपटातील नवे गाणे 'मैं हूं'. सलमान आणि चित्रांगदा सिंग यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे श्रेया घोषाल आणि आयॉन लाल यांनी गायले आहे. संगीत देखील त्यांचेच आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमदचे आहेत.

गाणे ऐकून काय म्हणाले सोशल मीडिया युजर्स?

व्हॅलेंटाईन स्पेशल रोमँटिक ट्रॅक 'मैं हूं' पाहिल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी प्रतिक्रिया देणे सुरु केलं. एका यूजरने लिहिलं- गाणे तर खूपच छान आहे. पण सलमानचा अभिनय नाही. आणखी एकाने लिहिलंय- समजून घे भाईजान, हे 90's नाही. तुझे काम बदल. आणखी एकाने म्हटले - श्रेयाचा आवाज सोडून...अनेक फॅन्सनी कॉमेंट्समध्ये रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

'बॅटल ऑफ गलवान' सलमान खान फिल्म्स बॅनर अंतर्गत बनवलं गेलं आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट शौर्य, बलिदानाची एक सत्य प्रतिमा सादर करणारा ठरतो. 'बॅटल ऑफ गलवान' रिलीज डेट बद्दल अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news