

मुंबई - क्रिकेटर हार्दिक पंड्या नेहमीच आपल्या खेळाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच यांचा घटस्फोट झालाय. दोघांनीच परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. पण हार्दिक पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो एका तरुणीमुळे. त्याचं नाव तया तरुणीशी जोडलं जातयं? तिचं नाव काय, ती नेमकी कोण आहे? जाणून घेऊया.
माहिकाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ४१ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. माहिकाने तिचे ग्लॅमरस फोटोज अपलोड केले आहेत. एका व्हिडिओमध्ये माहिकाच्या मागे हार्दिक दिसत होता आणि यामध्ये माहिकाच्या बोटावर ३३ क्रमांक होता, जो हार्दिकच्या जर्सीचा नंबर आहे. यानंतर दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा रंगली. याशिवाय दोघांनी एकमेकांच्या अनेक पोस्ट्सना लाईक्स केले आहे. माहिका शर्मा - हार्दिक एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो देखील करतात.
दुसरीकडे, दोघांच्या डेटिंगची अफवा रेडिट थ्रेडवर केलेल्या एका पोस्टनंतर सुरू झाले. या पोस्टमध्ये दिसले की, माहिका एक सेल्फी घेत आहे आणि फोटोमध्ये तिच्या मागे जी शॅडो दिसत होती, ती हार्दिक सारखी दिसत होती. दोघांकडून अद्याप कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही.
माहिका शर्माचे नाव सध्या हार्दिकशी जोडलं जात आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या नावाची चर्चा सुरु आहे. अखेर कोण आहे माहिका शर्मा? माहिका शर्मा एक मॉडल आणि अभिनेत्री आहे. तिचे इस्टाग्राम अकाऊंट असून तिला ४२.१Kलोक फॉलो करतात. ती फॅशन मॉडेल आहे. फॅशन - फिटनेस कंटेंट क्रिएटर असून तिने इन्स्टाग्रामवर माहिती दिलीय की, तिला प्रवास आणि योग करायला आवडतो. ती Elle model of the season आहे. आयएफए मॉडेल ऑफ द इयर, जीक्यू बेस्ट ड्रेस्ड “इंडियाज नेक्स्ट सुपरमॉडेल” तिने मिळवलं.
माहिकाच्या लिंक्डइन प्रोफाईल नुसार, तिने आपले शालेय शिक्षण दिल्लीतील नेवी चिल्ड्रन स्कूलमधून केले. पुढे इकोनॉमिक्स आणि फायनान्समधून शिक्षण घेतले. इंटर्नशिप करत असताना तिने मॉडलिंगदेखील केले. ती रॅपर रागाच्या एका म्युझिक व्हिडिओ मध्ये देखील दिसली. काही चित्रपटांमध्ये ती छोट्या-मोठ्या भूमिका साकारताना दिसली आहे.
तिने अनेक चित्रपट आणि जाहिरातीत देखील काम केलं आहे. अनेक डिझायनरसाठी रॅम्प वॉक करते. रितु कुमार, अनीता डोंगरे, तरुण तहिलियानी, मनीष मल्होत्रा आणि अमिता अग्रवाल या फॅशन डिझायनर्ससाठी काम केले आहे. २०२४ मध्ये इंडियन फॅशन ॲवार्ड्समध्ये मॉडल ऑफ द ईयरचा ॲवॉर्ड देखील तिने जिंकला आहे.