

सुधीर बाबू - सोनाक्षी सिन्हाच्या Jatadhara चित्रपटाची रिलीज डेट घोषित करण्यात आली आहे. 'जटाधारा' हिंदीसह तेलुगु भाषेत देखील मोठ्या पडद्यावर रिलीज होण्यास सज्ज आहे.
Sonakshi Sinha next fil Jatadhara release date announced
मुंबई : साऊथ स्टार सुधीर बाबू आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट 'जटाधारा' जी स्टुडियोज आणि प्रेरणा अरोरा द्वारा बनवण्यात आला आहे. जदाधारा चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. याआधी चित्रपटाचा धमाकेदार टीजर जारी करण्यात आला होता. तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता नवे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. महाकाव्याच्या दुनियेत पाऊल ठेवायला दोन्ही कलाकार सज्ज आहेत. निर्मात्यांनी एक जबरदस्त मोशन पोस्टर सोबत रिलीज डेटची घोषणा केली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जायसवाल आणि वेंकट कल्याण यांनी केलं आहे. या पोस्टरमध्ये सुदीप बाबू सोबत सोनाक्षी सिन्हा, दिव्या खोसला, शिल्पा शिरोडकर, इंदिरा कृष्णा, रवि प्रकाश, नवीन नेनी, रोहित पाठक, झांसी, राजीव कनकाला, शुभलेखा सुब्बाकर सह अन्य कलाकारांची दमदार उपस्थिती आहे.
७ नोव्हेंबर, २०२५ रोजी हिंदी सोबत तेलुगु भाषेत देखील मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. हा चित्रपट पुन्हा धुमाकूळ घालणार आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बंसल, शिविन नारंग, अरुणा अग्रवाल, शिल्पा सिंघल, निखिल नंदा यांनी केले आहे. सह-दिग्दर्शक कुस्सुम अरोरा आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्यूसर दिव्या विजय आणि सुपरव्हायजिंग प्रोड्यूसर भाविनी गोस्वामी आहेत.