Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer: कॉमेडी-रोमान्सचा फुल्ल तडका; जान्हवी-वरुणच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहाच

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer: कॉमेडी-रोमान्सचा फुल्ल तडका; जान्हवी-वरुणच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहाच
image of varun dhawanJanhvi Kapoor sanya malhotra and rohit saraf
Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer outInstagram
Published on
Updated on

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer released

मुंबई- बॉलिवूडमध्ये मोठ्या पडद्यावर नवी जोडी पाहायला मिळणार आहे. अभिनेता वरुण धवन आणि रोहित सराफ यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तुलसी कुमारी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या ट्रेलरमध्ये वरुण धवनचा संस्कारी आणि वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. त्याच्या समोर रोहित सराफने देखील दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. सोबतच जान्हवी आणि सान्या मल्होत्राने रोमान्सचा तडका लावला आहे.

image of varun dhawanJanhvi Kapoor sanya malhotra and rohit saraf
Sonakshi Sinha | अखेर सोनाक्षीच्या Jatadhara ची रिलीज डेट जाहीर; जबरदस्त मोशन पोस्टर प्रदर्शित

सनी संस्कारी की तुलसी कुमारीचा ट्रेलर मजेशीर

सनी संस्कारी की तुलसी कुमारी ट्रेलर रिलीज होताच प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. ट्रेलरची कहाणी वरुण धवन (सनी) सुकु होते. जो अनन्या (सान्या मल्होत्रा) च्या प्रेमात पडतो आणि बाहुबली स्टाईलमध्ये प्रपोज करतो. पण अनन्या, सनीचे प्रपोजल नाकारते. तर दुसरीकडे विक्रम (रोहित सराफ) देखील तुलसी (जान्हवी कपूर) शी ब्रेकअप करतो. त्यानंतर सनी - तुलसी आपले प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. सनी, तुलसी नकली लव्हर बनते. विक्रम आणि अनन्याच्या मनात पुन्हा प्रेम जागृत करते. दरम्यान, सनी - तुलसी खोटे प्रेमाचे नाटक करत-करत खऱ्या प्रेमात पडतात.

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चे कलाकार

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' मध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर, रोहित सर्राफ, सान्या मल्होत्रा, अक्षय ओबेरॉय, मनीष पॉल यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटामध्ये कॉमेडीचा तडका असून चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

image of varun dhawanJanhvi Kapoor sanya malhotra and rohit saraf
Actress Divorce Photoshoot | चक्क घटस्फोटाचा आनंद! अभिनेत्रीचा डिवोर्स फोटोशूट व्हायरल
कधी रिलीज होणार चित्रपट?
याआधी तुलसी कुमारी हा चित्रपट दुल्हनिया फ्रेंचायझी ठरणार होती. पण नंतर नाव बदलून सनी संस्कारी की तुलसी कुमारी ठेवण्यात आले. धर्मा प्रोडक्शन्स बॅनर अंतर्गत चित्रपट यावर्षी २ ऑक्टोबर रिलीज होईल. या चित्रपटातील गाणे 'बिजुरिया' आणि 'पनवाडी' आधीच रिलीज करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news