Death of Twins : फरशीवर सांडलेले केमिकल जुळ्या भावांनी चाटले अन् होत्याच नव्हत झालं

केरळच्या इडुक्कीमध्ये हृदयद्रावक घटना; कीटकनाशक असल्याचा पोलिसांना संशय
Death of Twins
Death of Twins : फरशीवर सांडलेले केमिकल जुळ्या भावांनी चाटले; एक वर्षाच्या दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यूfile photo
Published on
Updated on

kerala twins die after allegedly tasting chemical spilled home

पुढारी ऑनलाईन : घरात लहान मुले असतील तर त्‍यांना किती जपावे लागते हे त्‍या घरातील लोकांनाच माहित असते. लहान मुल जेंव्हा रांगायला लागते. तेंव्हा त्‍याच्या हाताला येईत ती गोष्ट ते तोंडात घालून त्‍याची चव चाखण्याचा प्रयत्‍न करते. त्‍यामुळे घरातल्यांकडून जमिनीवर काही वस्तू न ठेवण्याचा प्रयत्‍न असतो. त्‍यातही चुकून एखादी गोष्ट राहिल्यास कोणता अनर्थ होउ शकतो हे एका घटनेवरून समोर आले आहे..

Death of Twins
Cooking Oil : ४ जणांचे कुटुंब? महिन्याला फक्त इतकंच तेल मागवा; जास्त तेल ठरू शकतं धोकादायक!

केरळमधील इडुक्की जिल्ह्यात संशयित केमिकल चाखल्याने एक वर्षाच्या जुळ्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आदिमाली येथील वलाराकारा परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात केमिकलची बाटली पडल्याने ते द्रव पदार्थ फरशीवर सांडले होते. खेळत असताना दोन्ही चिमुकल्यांनी फरशीवर सांडलेले हे द्रव चाखले.

या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिहान आणि इहान अशी मृत्यू झालेल्या जुळ्या भावांची नावे आहेत. केमिकल चाखल्यानंतर दोन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. रात्री सुमारे १० वाजता दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री केमिकलने भरलेली एक बाटली स्वयंपाकघरातील फरशीवर पडली होती. त्यातून सांडलेले द्रव दोन्ही मुलांनी चाखल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीररीत्या बिघडली.

Death of Twins
Al Qaeda : ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत आहे ? अल-कायदाने पहिल्यांदाच प्रदर्शित केला व्हिडिओ

आदिमाली पोलिसांनी या प्रकरणी असामान्य मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना स्वयंपाकघरातून पेंट थिनरची एक बाटली आणि कीटकनाशकाची एक बाटली आढळली.

पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्याची तयारी केली आहे. केमिकल चाखल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला का, हे तपासणी अहवालातून स्पष्ट होणार आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोस्टमॉर्टमनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येतील. या घटनेचा पुढील तपास आदिमाली पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news