

Hansika Motwani Latest News:
सोनपरी आणि शकालाका बूम बूम या मालिकेत आपल्या अभिनयनाने लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे हंसीका मोटवानी. यानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने उत्तम यश मिळवले आहे. पण सध्या हंसीका चर्चेत आहे ते तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे. हंसीका आणि सोहेलमध्ये दरी पडल्याच सांगितले जात आहे. अर्थात हंसीकाकडून या विषयवार अजून कोणतेच विधान आलेले नाही. (Entertainment News Update)
हंसीका मोटवानी आणि सोहेल कथुरियाने 2022 मध्ये लग्न केले होते. अत्यंत राजेशाही थाटात हंसीकाचे लग्न पर पडले होते. लग्नानंतर हंसीका आणि सोहेल त्याच्या आईवडिलांसोबत नाही तर त्याच अपार्टमेंटमध्ये एक वेगळ्या फ्लॅटमध्ये रहात होते. पण तरीही सोहेलच्या मोठ्या कुटुंबासोबत जुळवून घेणे हंसीकाला जड जात असल्याचे समोर आले होते.
याला कंटाळून हंसीकाने हा फ्लॅट सोडला असल्याचे तिच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले आहे. लग्नाच्या केवळ दोन वर्षातच सोहेल आणि हंसीका वेगळे राहू लागल्याचे समोर आले. सोहेलने घटस्फोटाच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. तर हंसीकाने मात्र यावर न बोलणेच पसंत केले आहे.
हंसीका सध्या तिच्या आईसोबत रहात आहे तर सोहेल त्याच्या आई वाडिलांसोबत राहतो आहे. लग्नानंतर काही दिवसातच या दोघांच्या नात्यात दरी येऊ लागली.
हंसीकाने तेलुगू, तमिळ आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. वयाच्या 16 व्या वर्षीच तिने पहिल्या वाहिल्या सिनेमात सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
याशिवाय तिने मोठे दिसण्यासाठी हार्मोनचे इंजेक्शन घेतले होते अशी अफवादेखील तिच्याबाबत पसरली होती.
आपल्या मैत्रिणीच्या माजी नवऱ्याशी लग्न केल्यामुळे हंसीका ट्रोलदेखील झाली होती.