लोकप्रिय गेम शो बिग बॉसचा 19 वा सीझनची नांदी आता झाली आहे. या सिरिजचा बहुप्रतीक्षित टीजर आता समोर आला आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच या सीझनमध्येही हटके ट्विस्ट असणार आहे. यंदाच्या थीमचा विषय आहे 'घरवालों की सरकार' . या टीजरमध्ये सलमानही एखाद्या नेत्याप्रमाणे कोट आणि कुर्त्यामध्ये दिसतो आहे. (Entertainment Update)
जवळपास एक दशकाहून अधिक सलमान बिग बॉसच्या घराची ओळख बनला आहे. यावर्षीही त्याच्या खास अंदाजात तो हा शो होस्ट करणार असल्याचे समोर येत आहे.
बिग बॉसचा 19 चा प्रीमियर 24 ऑगस्टला होणार आहे. तर जियो हॉटस्टारवर रात्री 9 वाजता आणि कलर्सवर रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे.
अपूर्वा माखीजा: द रिबेल कीड म्हणून ओळख असलेली एन्फ्लूएन्सर
धनश्री वर्मा : क्रिकेटर युझवेंद्र चहलची माजी पत्नी
मूनमून दत्ता : तारक मेहता का उलटा चश्मा मधील अभिनेत्री
धीरज धुपर: ससुराल सिमर का या मालिकेत दिसलेला अभिनेता
मिस्टर फैसू : माजी खतरों के खिलाडी चे खेळाडू
हुनर हाली : हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री
मीरा देवस्थळी : हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री