अजय देवगणच्या सन ऑफ सरदारला या रविवारचा चांगलाच फायदा झालेला दिसतो आहे. 1 ऑगस्ट ला रिलीज झालेल्या या सिनेमाला समीक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. पण या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरू झाली आहे. (Entertainment News Update)
या कॉमेडी ड्रामाने पहिल्याच दिवशी 7.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या वीकएंडअखेर 24 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. 13.79 टक्क्यांनी वाढून 8.25 कोटी झाली. तर केवळ रविवारी या सिनेमाने 9.25 कोटी कमावले आहेत. हे सगळे मिळून या आठवड्याखेर 24.75 कोटींची कमाई केली आहे. अजयचा मागचा सिनेमा रेड 2 प्रमाणे हा सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. पण त्याची हळूहळू त्याच्या कमाईचा आकडा वाढतो आहे.
तर याच्या उलट सन ऑफ.. ने धडक 2 ला कधीच मागे टाकले आहे. धडक 2 ने पहिल्या आठवड्यात 11.50 कोटींची कमाई केली आहे. अर्थात अजयच्या या सिनेमाला मोहित सूरीच्या सैय्याराशीही टक्कर घ्यावी लागते आहे. सोशल मिडियावर मात्र सन ऑफ सरदारच्याबाबत नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
या सिनेमात अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवीकिशन, संजय मिश्रा, नीरु बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक दोबरियाल, विंदू दारा सिंह, रोशनी वालिया आणि साहिल मेहता यासारखे कलाकार आहेत. अजय देवगण आणि ज्योति देशपांडे या सिनेमाचे निर्माते आहेत.
बदलली होती रिलीज डेट
सन ऑफ सरदार हा सिनेमा 25 जुलैला रिलीज होणार होता. पण सैय्याराला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता मेकर्सनी हा सिनेमा एक आठवडानंतर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 25 जुलैला रिलीज होणारा सिनेमा 1 ऑगस्टला रिलीज झाला होता.