Gunmaaster G9 Teaser | ‘गनमास्टर जी9’चं विश्व सुरु होतंय; इमरान हाशमी पुन्हा लव्हर बॉयच्या अंदाजात (व्हिडिओ)

‘गनमास्टर जी9’चा जबरदस्त टिझर; इमरान हाशमी पुन्हा लव्हर बॉयच्या अंदाजात
Gunmaaster G9 Teaser
Gunmaaster G9 Teaser out Pudhari photo
Published on
Updated on

‘आवारापन 2’च्या यशानंतर अभिनेता इमरान हाशमीच्या पुढील चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून, ‘गनमास्टर जी9’चा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. इमरान हाशमी आणि जेनेलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात रोमान्स, म्युझिक आणि अॅक्शनचा जबरदस्त तडका पाहायला मिळणार आहे.

Gunmaaster G9 Teaser
Sriya Reddy | प्रभास ते अक्षय खन्ना...'या' अभिनेत्यांवर भारी पडलेली श्रिया रेड्डी आहे तरी कोण? 'महाकाली'मुळे होतेय प्रचंड चर्चा

आदित्य दत्त यांनी दिग्दर्शन केले असून, हिमेश रेशमियाच्या संगीतामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. अपारशक्ती खुराना यांच्यासोबत अभिनेता अभिषेक सिंह या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी निर्मात्यांनी सोशल मीडियावर ‘गनमास्टर जी9’चा टिझर शेअर केला. हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Gunmaaster G9 Teaser
'ही गोष्ट कुठल्या एका बाईची नाहीये, प्रत्येक दाबलेल्या आवाजाच्या..' ‘बंडखोर’ गोष्ट घेऊन येताहेत महेश मांजरेकर

‘गनमास्टर जी9’च्या टिझरमध्ये काय पाहायला मिळतं?

1 मिनिट 22 सेकंदांच्या टिझरमध्ये इमरान हाशमी पुन्हा एकदा लव्हर बॉयच्या भूमिकेत दिसत आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या प्रेमाच्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या गुंडांशी त्यांना दोन हात करावे लागणार आहेत. टिझरची सुरुवात डोंगरांनी वेढलेल्या परिसरातून होते. काही लोक इमरानच्या व्यक्तिरेखेवर हल्ला करून त्याला जबरदस्तीने एका व्हॅनमध्ये घेऊन जाताना दिसतात.

यानंतर इमरानचा दमदार व्हॉइसओव्हर ऐकू येतो. आपल्या प्रेमापर्यंत पोहोचेपर्यंत आपला श्वास थांबू नये, अशी विनंती तो महादेवांकडे करताना दिसतो. प्रेमासाठी कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची त्याची तयारी असल्याचे या संवादातून जाणवतं.

टिझरमध्ये इमरानचा अॅक्शन अवतारही पाहायला मिळतो. तो गुंडांशी दोन हात करताना दिसतो, तर दुसरीकडे आपल्या लेडी लव्हसोबत रोमँटिक क्षणही अनुभवताना दिसतो. विशेष म्हणजे, त्याच्या प्रेयसीचा चेहरा मात्र टिझरमध्ये दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे या भूमिकेत जेनेलिया देशमुख दिसणार का, याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पार्श्वभूमीवर ऐकू येणारं ‘अफसानम’ हे गाणं जुन्या काळातील रोमँटिक संगीताची आठवण करून देतं.

‘गनमास्टर जी9’ची निर्मिती दीपक मुकुट, हुनर मुकुट आणि संगीता अहीर यांनी केली आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. रोमँटिक अंदाजासोबत अॅक्शनचा तडका असलेला हा सिनेमा २७ नोव्हेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news