Gharoghari Matichya Chuli | पार पडणार ऋषिकेश-जानकीचा विवाह सोहळा

घरोघरी मातीच्या चुली : लाडके दादा-वहिनी पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत
Gharoghari Matichya Chuli tv serial
घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऋषिकेश-जानकीचा विवाह सोहळा होणारInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्याही लग्नाचा घाट घातलाय.

Instagram
Gharoghari Matichya Chuli tv serial
Navri Mile Hitlerla | लीलाचा जीव धोक्यात. एजे वाचवू शकेल लीलाला?
Summary

संगीत सोहळ्यासाठी नित्या-अधिराज, अंकुश-अबोली, सत्या-मीरा आणि छोट्या उस्तादांची खास हजेरी लागणार आहे

Instagram

मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरु आहे ती संगीत सोहळ्याची. जानकी-ऋषिकेशने संगीत सोहळ्यासाठी फिक्का जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. संगीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे. त्यामुळे रणदिवे कुटुंब जानकी-ऋषिकेशच्या रंगात रंगून गेलं आहे.

Gharoghari Matichya Chuli tv serial
Navra Maza Navsacha 2 Sequel | तब्बल १९ वर्षानंतर "नवरा माझा नवसाचा 2' चा सिक्वल
Instagram

रणदिवे कुटुंबासोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील नित्या-अधिराज, अंकुश-अबोली, साधी माणसं मालिकेतील सत्या मीरा आणि वैशाली सामंतसोबत छोट्या उस्तादांनी देखिल खास हजेरी लावली आहे. घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.

Instagram
Gharoghari Matichya Chuli tv serial
Kanguva Fire Song | कांगुवाचे फायर गाणे रिलीज; रॉकस्टार डीएसपी - बी प्राकचे म्युझिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news