Gauri Spratt wedding ring | १३१ कारागीर २५६ तासात तयार झाली गौरी स्प्रॅटसाठी अंगठी, आमिरने लग्नात घातली मादागास्कर रुबी

Gauri Spratt wedding ring | १३१ कारागीर २५६ तासात तयार झाली गौरी स्प्रॅटसाठी अंगठी, आमिरने लग्नात घातली मादागास्कर रुबी
Gauri Spratt
Gauri Spratt wedding ring story pudhari photo
Published on
Updated on
Summary

'वन इन अ मिलियन' (अद्वितीय) लग्नाची अंगठी कशी घडवली गेली? याबद्दलची माहिती समोर आलीय. आमिर खानने आपली पत्नी गौरी स्प्रॅट हिला एक खास बनवलेली लग्नाची अंगठी भेट दिली, ज्यामध्ये अत्यंत दुर्मिळ अशा 'कॅबोचॉन-कट' (cabochon-cut) मादागास्कर रुबीचा वापर करण्यात आला आहे.

How Aamir khan created ruby ring for Gauri Spratt

अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या विवाहसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. साध्या आणि खासगी पद्धतीने पार पडलेल्या या लग्नात आमिरने गौरीला दिलेल्या दुर्मिळ माणिकाच्या अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता या अंगठीचा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

Gauri Spratt
Rajesh Sharma health update: राजेश शर्मा यांना प्रकृती गंभीर असतानाही तत्काळ रुग्णालयात का नेले नाही? AICWAने केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

ही अंगठी तयार करण्यासाठी तब्बल २५६ तासांचा कालावधी लागला असून, १३१ कारागिरांनी तिची निर्मिती केलीय. याशिवाय या अंगठीत मौल्यवान रत्नांसह ४० अस्सल हिरे जडवण्यात आले आहेत.

आमिर आणि गौरी यांनी ५ जुलै रोजी वांद्रे येथील आमिरच्या निवासस्थानी कुटुंबीय आणि अतिशय जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत खासगी समारंभात विवाह केला. यावेळी आमिरची सर्व मुले लग्नासाठी उपस्थित होती. हा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला असला तरी गौरीसाठी निवडलेली अंगठी मात्र विशेष आकर्षण ठरली. ही अंगठी एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडने खास डिझाईन केलीय.

Gauri Spratt
Satluj Controversy: दिलजीत दोसांझच्या अडचणी वाढल्या... सतलज प्रकरणात वेगळा ट्विस्ट, भारत सरकारची तपासासाठी उच्चस्तरीय समिती

या अंगठीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये बसवण्यात आलेला मादागास्करमधील दुर्मिळ कॅबोशॉन-कट नैसर्गिक माणिक. गुळगुळीत, गडद लाल रंगामुळे हा माणिक विशेष ओळखला जातो. अंगठीची रचना देखील तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. माणिक केवळ अंगठीवर बसवलेला नसून, सोन्याच्या मुकुटासारखी उंचावलेली त्याची रचना आहे. त्याच्या भोवतीने सोन्याची नक्षी तयार करण्यात आली आहे.

माहितीनुसार, या अंगठीसाठी वापरण्यात आलेला मादागास्करचा दुर्मिळ माणिक मिळवण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागला. फायनल फिनिशिंगसाठी एकूण २५६ तासांपेक्षा अधिक वेळ लागला. १३१ कुशल कारागिरांनी ती अंगठी घडवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news