गाथा नवनाथांची मालिकेने गाठला ६०० भागांचा टप्पा

navnath tv serial
navnath tv serial
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आतापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. आता मालिकेत राजपुत्र कृष्णधर याचा चौरंगीनाथ होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. मालिकेत लवकरच चौरंगीनाथ पाहायला मिळतील. राजपुत्राचा जन्म कसा झाला आणि त्यांचे चौरंगीनाथ हे रूपांतर कसे होणार, हे आपल्याला महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

गाथा नवनाथांची मालिका आता ६०० भागांचा टप्पा पार करत आहे. आतापर्यंतच्या नाथांचा प्रवास आणि पुढील वाटचाल यांत मालिकेने ६०० भाग पूर्ण केले. आतापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. 'गाथा नवनाथांची' या मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा पाहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, नाथ अशुभ शक्तींचा नाश कसा करणार, हे पाहणे रंजक ठरेल. भर्तरीनाथ वर आलेले संकट परतविण्यास मच्छिन्द्रनाथ मदत करू शकतील का हे पाहण्यास मिळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news