Gandhari script Controversy|'गांधारी'चा वाद; कथेची संकल्पना चोरल्याचा दावा Netflix च्या रुचिका कपूरने फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

Gandhari script Controversy|'गांधारी'चा वाद; कथेची संकल्पना चोरल्याचा दावा Netflix च्या रुचिका कपूरने फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Gandhari script Controversy
Gandhari script ControversyPudhari photo
Published on
Updated on
Summary

तापसी पन्नूची आगामी Netflix फिल्म 'गांधारी' रिलीजपूर्वीच कथानक चोरीच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. लेखक कल्याण बंदी यांनी 2019 मध्ये 'गांधारी' नावाची कथा लिहून नोंदणी केली होती आणि तिची संकल्पना एका आईभोवती फिरत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ही कथा त्यावेळी मोनिका शेरगिल यांच्याकडे पिच केली होती. मात्र चित्रपटाची लेखिका आणि निर्माती कनिका ढिल्लों यांच्या प्रॉडक्शन हाऊसने आरोप फेटाळून 'गांधारी' पूर्णपणे ओरिजिनल असल्याचे म्हटले. आता Netflixच्या रुचिका कपूर शेख यांनीही संबंधित पिच आणि कनिका ढिल्लों-तापसी पन्नू यांच्या 'गांधारी'मध्ये मोठा फरक असल्याचे स्पष्ट केले आहे.

'नेटफ्लिक्स'चा चित्रपट 'गांधारी' लवकरच रिलीज होणार आहे. पण त्याआधी 'गांधारी'च्या पटकथेवरून वाद सुरु आहे. एका लेखकाने पटकथा (मूळ संकल्पना) चोरल्याचा केलेला दावा नेटफ्लिक्सच्या रुचिका कपूर यांनी फेटाळून लावला आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. कनिका धिल्लन लिखित आणि निर्मित, देवाशिष मखिजा दिग्दर्शित चित्रपटात इश्वक सिंग, छाया कदम, स्वस्तिका मुखर्जी, मीता वशिष्ठ, जतिन सरना यांच्याही भूमिका आहेत.

Gandhari script Controversy
Gunmaaster G9 Teaser | ‘गनमास्टर जी9’चं विश्व सुरु होतंय; इमरान हाशमी पुन्हा लव्हर बॉयच्या अंदाजात (व्हिडिओ)

लेखकाचा पटकथा चोरल्याचा दावा

या चित्रपटासाठी आपली मूळ संकल्पना चोरल्याचा आरोप एका लेखकाने नेटफ्लिक्सवर केला होता. पण त्यानंतर नेटफ्लिक्स इंडियाच्या रुचिका कपूर यांनी सांगितले की, ती संकल्पना 'गांधारी'पेक्षा खूपच वेगळी होती. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच, लेखकान दावा केला की, हा चित्रपट त्यांच्या संकल्पनेवरून चोरला गेला आहे. त्यांनी २०१९ मध्ये 'गांधारी' नावाची कथा लिहिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही कथा एका अशा आईभोवती फिरते जी आपल्या मुलाला बाल-तस्करीच्या रॅकेटपासून वाचवताना जवळपास देवीसारख्या रूपात रूपांतरित होते.

रुचिका कपूर म्हणाल्या की, "आम्ही कलात्मक श्रेय (आर्टिस्टिक ॲट्रिब्युशन) देण्याच्या बाबीला अत्यंत गांभीर्याने घेतो. आम्हाला अनेक कथा-संकल्पना (पिचेस) सादर केल्या जातात आणि संबंधित संकल्पना ही कनिका धिल्लन आणि तापसी पन्नू यांच्या 'गांधारी'पेक्षा खूप वेगळी आहे. मी यावर इतर कोणतेही तर्कवितर्क करणार नाही. कृपया चित्रपट पहा. तुम्ही ट्रेलर पाहिलाच आहे."

लेखक म्हणाले, सप्टेंबर २०२५ मध्ये 'गांधारी'च्या घोषणेबद्दल समजल्यावर, त्यांनी आपल्या कामाचे श्रेय आणि सुमारे ४० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होता. परंतु त्यांच्या मते, पैसे मिळवणे हा कधीच मुख्य उद्देश नव्हता. ते पुढे म्हणाले, "मला पैसेही नकोत. फक्त धन्यवाद म्हणा आणि ती माझी कल्पना होती हे मान्य करा. जर त्यांनी मला हे सिद्ध करून दाखवले की ही माझी कथा नाही, तर मला खूप आनंद होईल."

कनिका धिल्लन यांनी आरोप फेटाळले

चित्रपटाच्या लेखिका कनिका धिल्लन यांनी लेखकाचे आरोप फेटाळून लावले आहेत. कनिका धिल्लन यांच्या 'कथा पिक्चर्स' (Kathha Pictures) या प्रॉडक्शन हाऊसने एका अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. त्यात म्हटले आहे, "सोशल मीडिया आणि काही प्रकाशनांमध्ये फिरणाऱ्या अशा आरोपांकडे आमचे लक्ष वेधले गेले आहे की, आमचा आगामी चित्रपट 'गांधारी' हा दुसऱ्या व्यक्तीच्या कल्पनेची नक्कल करतो आणि त्या व्यक्तीचे शीर्षक वापरतो. हे आरोप खोटे आहेत आणि आम्ही त्यांचा स्पष्टपणे इन्कार करतो. 'गांधारी' ही एक स्वतंत्र आणि मूळ कलाकृती आहे; तिचे लेखन आणि निर्मिती कनिका धिल्लन यांनी केली असून विकास 'कथा पिक्चर्स'ने केला आहे. तिची कथा आणि पटकथा ही पूर्णपणे धिल्लन यांची स्वतःची निर्मिती आहे."

'गांधारी'बद्दल...

'जॉयपुरा' या काल्पनिक शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित, 'गांधारी' ही एक आई असते. तिचे वर्णन 'बानी' असे करण्यात आले आहे. तिच्या निष्ठेची प्रत्येक वळणावर परीक्षा घेतली जाते. तिला प्रत्येक टप्प्यावर अकल्पनीय आव्हानांचा सामना करण्यास भाग पाडले जाते. हा चित्रपट ३ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Gandhari script Controversy
'ही गोष्ट कुठल्या एका बाईची नाहीये, प्रत्येक दाबलेल्या आवाजाच्या..' ‘बंडखोर’ गोष्ट घेऊन येताहेत महेश मांजरेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news