नवा गडी नवं राज्य फेम कर्णिकांच्या घरी होणार बाप्पाचे आगमन

नवा गडी नवं राज्य फेम कर्णिकांच्या घरी होणार बाप्पाचे आगमन

Published on

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहे. आतापर्यंतच्या भागात कर्णिकांच्या घरात आनंदी स्थिरता आणण्याचा प्रयत्न करते असेत. रमाच्या आणि आनंदीच्या कुरापतींमध्ये त्यांची एका गोष्टीवर एक वाक्यता होते, ती म्हणजे दोघींची गणपती बाप्पावरची अपार श्रद्धा. यामुळे कर्णिकांच्या घरी लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे.

मालिकेत आनंदीला कळते की, राघवने रमा गेल्यापासून गणपतीची स्थापना केली नाही. पण आता आनंदी ठरवते की तिच्या स्वतःच्या व रमाच्या इच्छेसाठी तसेच कौटुंबिक आनंदासाठी पुन्हा गणपती बाप्पा बसवायचा. तर आता सहा वर्षानंतर बाप्पा पुन्हा एकदा कर्णिकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. यामुळे कर्णिकांकडे अत्यंत आनंदात होणारे बाप्पाचे आगमन चाहत्यांच्या अनुभवायला मिळतेय.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news