Ranveer Nude Photoshoot : पुन्हा चौकशीला बोलावलं तर सहकार्य करेन-रणवीर | पुढारी

Ranveer Nude Photoshoot : पुन्हा चौकशीला बोलावलं तर सहकार्य करेन-रणवीर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट (Ranveer Nude Photoshoot ) प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.  याप्रकरणी आज त्‍याने चेंबूर पोलिसांसमोर आपला जबाब नोंदविला. यावेळी त्याने पुन्हा चौकशीसाठी बोलावलं तर सहकार्य करेल, असे सांगितले. (Ranveer Nude Photoshoot )

‘पेपर’ या मॅगझीनसाठी रणवीरने न्यूड फोटोशूट केले होते. या बोल्ड फोटोशूटवरून सोशल मीडियावर मोठा वाददेखील झाला होता. याप्रकरणी रणवीरला समन्स बजावण्यासाठी मुंबई पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते. मात्र त्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. अभिनेत्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी रणवीरला २२ ऑगस्टपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर रणवीरने मुंबई पोलिसांकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये सकाळी ७ वाजता हजर झाला होता. साधारण दोन तास त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू होती. त्याचा जबाब नोंदवण्याची प्रक्रियाही करण्यात आली. यावेळी त्याची लीगल टीमदेखील त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला हजर होती.

‘राख’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button