Ranveer Singh Controversy: 'डॉन 3' प्रकरणात मोठी घडामोड; रणवीर सिंहविरोधातील कारवाई रद्द, FWICE ने घेतला यू-टर्न

Ranveer Singh Don 3 Controversy: 'डॉन 3' वादात अभिनेता रणवीर सिंहला मोठा दिलासा मिळाला असून FWICE ने त्याच्याविरोधातील नॉन-कोऑपरेशन आदेश मागे घेतला आहे.
Ranveer Singh Don 3 Controversy
Ranveer Singh Don 3 ControversyPudhari
Published on
Updated on

Ranveer Singh Don 3 Controversy: अभिनेता रणवीर सिंह आणि 'डॉन 3' चित्रपटाभोवती सुरू असलेल्या वादात मोठी घडामोड घडली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) रणवीर सिंहविरोधात जारी केलेला 'नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह' अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या वादाला नवे वळण मिळाले आहे.

बुधवारी FWICE ने अधिकृतपणे ही घोषणा केली. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA), प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया (PGI) आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

काय होता वाद?

'डॉन 3' या बहुचर्चित चित्रपटातून रणवीर सिंहने अचानक माघार घेतल्याचे वृत्त समोर आले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तर यांच्या या प्रोजेक्टमधून रणवीर बाहेर पडल्याने निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता.

याच पार्श्वभूमीवर FWICE ने रणवीरविरोधात 'नॉन-कोऑपरेशन' आदेश जारी केला होता. त्यानुसार संघटनेशी संलग्न सदस्यांनी रणवीरशी संबंधित प्रोजेक्टवर काम करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.

रणवीरच्या कायदेशीर नोटिसीनंतर बदलले चित्र

FWICE च्या निर्णयानंतर रणवीर सिंहनेही कायदेशीर पावले उचलली. अभिनेत्याने संघटनेला कायदेशीर नोटीस पाठवत या कारवाईला आव्हान दिले. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील विविध संस्थांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्व पक्षांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्याने FWICE ने आपला आदेश मागे घेतला आहे.

Ranveer Singh Don 3 Controversy
Maharashtra Epstein Files |'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' मधून 'कॅप्टन भोंदू बाबा'चा खरा चेहरा येणार समोर!

"कोणी जिंकले नाही, कोणी हरले नाही"

FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "IMPPA, प्रोड्युसर्स गिल्ड आणि CINTAA यांच्या विनंतीनंतर आम्ही नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह तत्काळ मागे घेत आहोत. सर्व संबंधितांनी एकत्र बसून असा निर्णय घ्यावा की ज्यामुळे अभिनेता, निर्माता किंवा दिग्दर्शक कोणालाही अडचण येणार नाही."

ते पुढे म्हणाले, "या प्रकरणात कोणीही जिंकलेले नाही किंवा हरलेले नाही. रणवीरने पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीला आमचा कायदेशीर विभाग योग्य उत्तर देईल."

रणवीरची शांतता कायम

दरम्यान, रणवीर सिंहच्या प्रवक्त्यानेही यापूर्वी भूमिका स्पष्ट केली होती. 'डॉन 3' संदर्भातील घडामोडींमध्ये रणवीरने जाणीवपूर्वक मौन बाळगले होते. व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध परस्पर सन्मान, परिपक्वता आणि संयमाने हाताळले जावेत, अशी त्याची भूमिका असल्याचे प्रवक्त्याने म्हटले होते. तसेच रणवीरचा 'डॉन 3'शी संबंधित सर्व व्यक्तींविषयी आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीविषयी आदर कायम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.

Ranveer Singh Don 3 Controversy
Ankush Chaudhari | तेजश्री प्रधान-अनुरागची मैत्री पुन्हा चर्चेत; वाढदिवसाच्या पोस्टने वेधले लक्ष

पुढे काय?

FWICE ने आदेश मागे घेतल्याने रणवीर सिंहवरील दबाव कमी झाला असला, तरी 'डॉन 3'मधून बाहेर पडण्यामागील नेमके कारण आणि या वादाचा अंतिम तोडगा काय निघणार याकडे आता संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. सध्या मात्र रणवीर सिंहला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news