Ankush Chaudhari | तेजश्री प्रधान-अनुरागची मैत्री पुन्हा चर्चेत; वाढदिवसाच्या पोस्टने वेधले लक्ष

'ती सध्या काय करते?' फेम तेजश्री प्रधानचा वाढदिवस; 'अनुराग'च्या खास पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष!
Ankush Chaudhari- tejashri pradhan
Ankush Chaudhari shared special post for tejashri pradhan on birthday
Published on
Updated on
Summary

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अनुरागने केलेल्या खास पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टवर अभिनेता अंकुश चौधरीने दिलेल्या प्रतिक्रियेने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तेजश्री-अनुरागच्या मैत्रीची पुन्हा चर्चा रंगली आहे.

Ankush Chaudhari shared special video for tejashri pradhan on birthday

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा आज वाढदिवस असून सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने 'ती सध्या काय करते' या गाजलेल्या चित्रपटातील तिचा सहकलाकार अंकुश चौधरी याने केलेली एक खास पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या चित्रपटात 'अनुराग'ची भूमिका साकारणाऱ्या अंकुश चौधरीने तेजश्रीसोबतच्या मैत्रीबद्दल भावूक शब्द लिहिले आहेत.

Ankush Chaudhari- tejashri pradhan
Kangana Ranaut On Girija Oak |'अपने खुबसुरती का इस्तेमाल करो', 'नॅशनल क्रश'च्या प्रश्नावर मिश्किल उत्तर, गिरीजाच्या सौंदर्यावर कंगना फिदा

त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, " 'ती सध्या काय करते?' हे लोकांना आजही पडलेलं कोडं आहे... पण तिचा ‘अनुराग’ म्हणून मला माहित आहे, ती सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय!" त्याने पुढे तेजश्रीच्या मैत्रीला 'हक्काची मैत्री' असे संबोधत तिचा अभिमान वाटत असल्याचेही नमूद केले आहे. या पोस्टमुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा 'अनुराग आणि तन्वी'च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

तेजश्री प्रधान आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त अभिनेता अंकुश चौधरीने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ती सध्या काय करते, या चित्रपटातील काही निवडक क्षणांचा व्हिडिओ त्याने अपलोड केलाय. या सुपरहिट चित्रपटातील दोघांच्या सुंदर क्षणांना व्हिडिओमध्ये पाहून चाहते 'मराठी सिनेसृष्टीतील आत्तापर्यंत तयार झालेली सर्वात सर्वात सर्वात सुंदर गोष्ट' अशी कमेंट देत आहेत.

Ankush Chaudhari- tejashri pradhan
Don 3 Controversy: FWICE च्या ‘असहकार’ आदेशावर प्रश्नचिन्ह; निर्मात्याची कोर्टात याचिका

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातील अनुराग आणि तन्वीची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटात अनुराग (अन्या) च्या भूमिकेत अंकुश चौधरी आणि तन्वी (गायत्री) च्या भूमिकेत तेजश्री प्रधान होते. हा चित्रपट प्रेमकथा आणि उत्कृष्ट गाण्यांसाठी ओळखला जातो.

दरम्यान, तेजश्री सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news