

Bombay HC tells Shilpa Raj Kundra 60 crore rupess deposite first
मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालायाने सुनावले. आधी ६० कोटी जमा करा, नंतर परदेशात जा, असे निर्देश कोर्टाने या कपलला दिले आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या ६० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही फसवणूक त्यांच्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या (आता अस्तित्वात नाही) कंपनीत गुंतवणूक डील संदर्भातील आहे.
या प्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जवळपास साडे चार तास शिल्पा शेट्टीची चौकशी केली. या प्रकरणामध्ये शिल्पाचे पती राज कुंद्रासह पाच लोकांचे जबाब नोंदवण्यात आला आहे. या कपलने कोर्टाकडे परदेशात जाण्यासाठी परवानगी मागितली होती. पण कोर्टाने ती नाकारत सांगितले की, जेव्हा ते ६० कोटी रुपये जमा करतील, तेव्हा विचार करण्यात येईल.
व्यावसायिक दीपक कोठारी यांनी राज कुंद्रा- शिल्पा शेट्टी यांनी २०१५ ते २०२३ या काळात त्यांच्याकडून ६० कोटी रूपये घेतले होते. त्यांनी हे पैसे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी घेतले होते. मात्र या कपलने हे सर्व पैसे आपल्या वैयक्तिक खर्चासाठी वापरले, असा दावा दीपक कोठारी यांनी केला. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हे पैसे कर्जाच्या स्वरूपात घेतले होते. मात्र त्यांनी नंतर हे पैसे कर वाचवण्यासाठी गुंतवणूक म्हणून दाखवले.
गुंतवणुकीच्या नावाखाली दीपक कोठारी यांची अंदाजे ६० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी जुहू पोलिस ठाण्यात या कपल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून कुंद्राचा जबाब नोंदवला आणि यापूर्वी अभिनेत्री आणि त्यांच्या पतीविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केले होते.