

‘धुरंधर’ चित्रपटाने प्रदर्शना पासूनच बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला आहे. सहाव्या दिवशीही या चित्रपटाच्या कमाईत भरीव वाढ झाली आहे. येत्या दिवसांतही हा तुफान तसाच राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
Dhurandhar Box Office Collection 6th day
रणवीर सिंहचा चित्रपट धुरंधरची कमाईचा आकडा थांबायचं नाव घेईना. कमाई पाहून वाटत आहे की, हा चित्रपट अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. रिलीजला ६ दिवस झाले आहेत. पण एका आठवड्यानंतरही बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरुच आहे. कमाईचा जबरदस्त आकडा समोर आला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सहा दिवसात हा आकडा २०० कोटी पर्यंत पोहोचला आहे.
सहा दिवसांची धुरंधरची कमाई -
पहिला दिवस - २८ कोटी
दुसरा- ३२ कोटी
तिसरा- ४३ कोटी
चौथा - २३.२५ कोटी
पाचवा- २७ कोटी
सहावा- २६.५० कोटी
एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन - १७९.७५ कोटी रुपये.
'धुरंधर' वर्ल्डवाईड कलेक्शन
'धुरंधर'च्या वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये चित्रपटाने पाच दिवसात ग्लोबल बॉक्स ऑफिसवर २३३.५० कोटी कमावले. आता सहाव्या दिवसाचा आकडा समोर आला असून २७४ कोटी रु. वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन केले आहे. चित्रपटाने चार दिवसात परदेशात जवळपास ५८ कोटी रुपयांहून अधिक ग्रॉस बिझनेस केला आहे.
हृतिक रोशन आणि अक्षय कुमारकडून कौतुकाची थाप
केवळ चाहत्यांमध्ये नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही धुरंधरचे कौतुक केले आहेत. आता या यादीत हृतिक रोशन आणि अक्षय कुमार यांचाही समावेश झाला आहे, त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून धुरंधर बद्दल पोस्ट लिहिलीय.
हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "मला चित्रपट आवडतो. मला असे लोक आवडतात जे एका चक्रव्यूहात अडकतात आणि त्या कथेला नियंत्रणात आणू देतात, त्यांना वळवतात, त्यांना जे म्हणायचे आहे ते पडद्यावर येईपर्यंत...धुरंधर हे त्याचे एक उदाहरण आहे. मला कहाणी आवडले. हाच सिनेमा आहे."
हृतिकने पुढे लिहिले, "मी कदाचित त्याच्या राजकारणाशी सहमत नसेन आणि चित्रपट निर्मात्यांनी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत यावर मी वाद घालू शकतो. तरीही, चित्रपटाचा विद्यार्थी म्हणून मला ते किती आवडले आणि त्यातून मी काय शिकलो हे मी दुर्लक्ष करू शकत नाही. ते आश्चर्यकारक आहे."