

कृतिक कामरा आणि गौरव कपूर यांनी त्यांच्या रिलेशनशिपची आज सार्वजनिकपणे घोषणा केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या ब्रेकफास्ट डेटमधील फोटोमुळे त्यांचे रिलेशनशीप कन्फर्म झाले आहे.
Kritika Kamra Relationship confirm on social media
बॉलिवूड अभिनेत्री कृतिक कामरा आणि प्रसिद्ध कंटेन्ट क्रिएटर गौरव कपूर सोबतचे रिलेशनशीप कन्फर्म केले आहे. तिने इन्स्टाग्राम हँडलवरून त्यांच्या प्रेमाबद्दलची फोटो पोस्ट अधिकृतपणे घोषित केली आहे. कृतिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही रोमँटिक आणि आरामदायक “ब्रेकफास्ट डेट”चे फोटो शेअर केले, ज्यात दोघेही आनंददायी चेहऱ्याने दिसत आहेत.
कृतिका व गौरव यांचा हा निर्णय काही महिन्यांच्या अफवा आणि चर्चेनंतर आला आहे. या दोघांमध्ये पूर्वी काही वेळापासून डेटिंगच्या अफवा होत्या, परंतु मात्र आजच्या पोस्टमुळे त्यांचे रिलेशन आता सार्वजनिक झाले आहे.
कृतिकाने शेअर केली पोस्ट
बुधवारी, कृतिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले. ज्यामध्ये कृतिका आणि गौरव दोघेही दिसतात. ते एकत्र नाश्ता करताना दिसत आहे. सोबत कॉफीचा देखील आस्वाद त्यांनी घेतला आहे. हे फोटो शेअर करताना, कृतिकाने कॅप्शनमध्य़े म्हटलंय - "ब्रेकफास्ट विथ"
गौरव कपूरचा "ब्रेकफास्ट विथ गौरव कपूर" नावाचा एक यूट्यूब शो आहे, ज्यामध्ये तो क्रिकेट सेलिब्रिटींशी संवाद साधतो. या फोटोंमध्ये कृतिका आणि गौरवची सेल्फी आहे. शिवाय त्य़ांचे फोटो जरी वेगवेगळे असले तरी बॅकग्राऊंड सारखेच आहे. त्यांच्या कॉफी मगवर "बेबी" असा शब्द लिहिलेला असून एक व्हिडिओ देखील शेअर करण्य़ात आला आहे.
अफवांना पूर्णविराम
कृतिका आणि गौरवच्या नात्याबद्दलच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. आता सोशल मीडिया पोस्टमुळे या अफवांना पूर्णविराम लागला आहे. ते मुंबईत एकत्र स्पॉट झाल्यानंतर चर्चांना गती पकडली होती. ते अनेकदा बांद्रा आणि रेस्टॉरंट्समध्ये डिनरसाठी एकत्र दिसले होते.
कृतिका- टीव्ही ते चित्रपट अभिनेत्री
कृतिका मूळची उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे. कृतिकाने टीव्ही इंडस्ट्रीतून अभिनयाला सुरुवात केली होती. कुछ तो लोग कहेंगे, कितनी मोहब्बत है, रिपोर्टर्स या काही टीव्ही मालिका आहेत. तिने पुढे वेब सिरीज, चित्रपटही केले. तांडव, बॉम्बे मेरी जान, भीडमध्ये ती दिसली.