Rohit Shetty: दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार; जुहू परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त, नेमकं काय घडलं?

Rohit Shetty Firing Case: मुंबईच्या जुहू परिसरात दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून तपास सुरू आहे.
Rohit Shetty Firing Case Mumbai Police
Rohit Shetty Firing Case Mumbai PolicePudhari
Published on
Updated on

Rohit Shetty Firing Case Mumbai Police: मुंबईच्या जुहू परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या निवासस्थानाबाहेर चार राऊंड फायरिंग करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी तपास करत आहे.

Rohit Shetty Firing Case Mumbai Police
Mardaani 3 BO collection | राणी मुखर्जीला शाहरुख खानचा पाठिंबा, ‘मर्दानी ३’ची बॉक्स ऑफिसवर भरारी

पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, गोळीबारामागे नेमकं कोण आहे आणि यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे. सध्या तरी या घटनेबाबत रोहित शेट्टी किंवा पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

दरम्यान, गोळीबारानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टी यांच्या घराभोवती पोलीस तैनात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Rohit Shetty Firing Case Mumbai Police
Cocktail 2 |‘कॉकटेल-२’वर मोठी बातमी! दिग्दर्शकाच्या अपडेटनंतर शाहिद-रश्मिका-क्रिती सेनॉनचा जल्लोष

रोहित शेट्टी हे बॉलिवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक मानले जातात. त्यांनी अलीकडेच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अजय देवगनसह अनेक नामवंत कलाकार झळकले होते आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

या गंभीर घटनेमुळे बॉलिवूड विश्वातही खळबळ उडाली असून, पोलीस तपासातून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news