Films BO collection : अजय देवगनच्या Dhamaal 4 चा जलवा, The Odyssey, वेलकम टू द जंगल अन् अल्फाचे काय म्हणताहेत आकडे?

Films BO collection | अजय देवगनच्या Dhamaal 4 चा जलवा, The Odyssey, वेलकम टू द जंगल अन् अल्फाचे काय म्हणताहेत आकडे?
films BO collection
films BO collectionpudhari photo
Published on
Updated on
Summary

बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू असली तरी अजय देवगनचा 'धमाल 4' कमाईच्या बाबतीत आघाडीवर कायम आहे. दुसऱ्या आठवड्यातही या कॉमेडी चित्रपटाने दमदार कामगिरी करत प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राखला आहे

films Box Office collection

विकेंडला विविध चित्रपटांनी तिकिट खिडकीवर चांगला गल्ला जमवला आहे. चार चित्रपटांमध्ये कलेक्शन वॉर पाहायला मिळाले. हॉलीवुड चित्रपट द ओडिसी (The Odyssey) समोर अजय देवगनच्या धमाल ४, आलिय भट्ट-शर्वरी वाघच्या अल्फा आणि अक्षय कुमारच्या वेलकम ३ ने किती कमावले?

films BO collection
Anniqa Jamal Iqbal: पाकिस्तानी सुंदरी अनिका जमाल इक्बाल कोण? 73 वर्षांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धेत पहिल्यांदाच एन्ट्री; देशात खळबळ

द ओडिसी

क्रिस्टोफर नोलनचा ॲक्शन थ्रिलर द ओडिसी १७ जुलै रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर १७ कोटी रुपये कमावसे. तर रविवार वीकेंडचा फायदा ही द ओडिसीला झाला. रविवारी चित्रपटाने २१ कोटी रुपयांची कमाई केली.

अल्फा बॉक्स ऑफिस कलेक्शन

आलिया भट्टचा ॲक्शन थ्रिलर अल्फा देखील चांगली कमाई केली. हा चित्रपट रिलीज होऊन तीन आठवडे होत आले. शनिवारी ४५ लाख रुपये तर रविवारी ६४ लाख रुपयांचा गल्ला जमवला.

धमाल ४

अजय देवगनचा कॉमेडी धमाल ४ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण झाला. धमाल ४ ने रविवारी १२.७५ कोटींची कमाई केली, ज्यामुळे एकूण कलेक्शन १२४.६४ कोटी रुपये झाले.

वेलकम टू द जंगल

अक्षय कुमार स्टारर चित्रपट वेलकम टू द जंगलने रविवारी ६६ लाख तर शनिवारी ४० लाखांची कमाई केली. आतापर्यंत १३३.११ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केलीय.

films BO collection
Salman Khan Health|अशक्त सलमानला पाहून फॅन्स चिंतेत, लगेच अभिनेत्याने शेअर केली मिश्किल पोस्ट- 'तुमची तब्येत कशी आहे?' (Video)

येत्या काही दिवसांत या चित्रपटांच्या कमाईत किती बदल होतो, याकडे चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांचेही लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news