Film TADAP : ‘तडप’चे पहिले गाणे ‘तुमसे भी ज्यादा’ लॉन्च

Film TADAP : ‘तडप’चे पहिले गाणे ‘तुमसे भी ज्यादा’ लॉन्च
Published on
Updated on

अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा (Film TADAP) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अहान त्याच्या पहिल्या चित्रपटात तारा सुतारियासोबत दिसणार आहे आणि चित्रपटाच्या रॉ आणि इंटेन्स ट्रेलरने प्रत्येकाला कथेशी जोडले आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला रसिकांची खूप पसंती मिळत आहे.

'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' आज धनत्रयोदशीला रिलीज झाले असून अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली आहे.क्लिपमध्ये तो आणि तारा चुंबन घेताना आणि रोमांचक क्षण एकत्र घालवताना दिसतात मात्र, पुढच्याच क्षणी कोणीतरी त्यांना ओढून एकमेकांपासून दूर करतात. त्याची बाईक देखील पेटवली जाते. एकूणच या गाण्याने चाहत्यांना चित्रपटांविषयी उत्सुक केले आहे.

साजिद नाडियाडवाला निर्मित, फॉक्स स्टार स्टूडियोजद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मिती आहे. रजत अरोरा लिखित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित हा चित्रपट आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट प्रॉडक्शन 'तडप' ३ डिसेंबर, २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news