Dhurandhar worldwide box office collection | 'धुरंधर'ने तिसऱ्या आठवड्यात घडवला इतिहास, आता चार अंकी कलेक्शनकडे वाटचाल!

Dhurandhar worldwide box office collection | 'धुरंधर'ने तिसऱ्या आठवड्यात घडवला इतिहास, पार केलं ९०० कोटींचं भव्य माईलस्टोन!
image of ranveer singh
Dhurandhar worldwide box office collection update instagram
Published on
Updated on
Summary

'धुरंधर' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. तिसऱ्या आठवड्यातच या चित्रपटाने ९०० कोटींची कमाई पार केली आहे. 'धुरंधर'ला दर्शकांकडून अपार प्रेम मिळालं असून, चित्रपट निर्मात्यांसाठी हा एक मोठा विजय ठरला आहे. चित्रपटाच्या यशामुळे मराठी सिनेमा जगतात नवीन दिशा मिळाली आहे.

Dhurandhar worldwide box office collection day 19

आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर' चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात इतिहास घडवला आहे. कोटींचा एक महत्त्वाचा टप्पा गाठत या चित्रपटाने जगभरात तब्बल ९०० कोटींहून अधिक कमाई केलीय. धुरंधरने पहिल्या दिवसापासून कमाईची गती कायम ठेवली आहे. आता २०२५ मधील हा चित्रपट ग्लोबल सर्वाधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. 'धुरंधर'ने तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे.

वर्षाच्या अखेरपर्यंत तो तब्बल १ हजार कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात येट आहे. तिसऱ्या सोमवारनंतर पहिल्यांदाच मोठी घसरण झाली होती. पण, 'धुरंधर'ने मंगळवारी पुन्हा एकदा कमाईचे आकडे स्थिर झाले. त्यानंतर कमाईत घसरण झाली नाही. मंगळवारी १९ व्या दिवशी 'धुरंधर'ने भारतात १७.२५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. त्यामुळे देशातील कलेक्शन ५८९.५० कोटी झाले होते.

image of ranveer singh
Jitendra Joshi-Jui Bhagwat Film Trailer: एन्काऊंटरचं गूढ उलगडणार जितेंद्र जोशी, "मॅजिक" चित्रपटाचा ट्रेलर लाँच

वर्ष संपण्यासाठी अद्याप एक आठवडा बाकी आहे. शिवाय, आठवड्याच्या विकेंडचा फायदा चित्रपटाला होईल. 'पुष्पा २: द रुल'ने तिसऱ्या आठवड्यात १२९ कोटी रुपये मिळवले होते. 'बाहुबली २'ने तिसऱ्या आठवड्यात १२७ कोटी रुपये कमावले होते. 'धुरंधर'ने तिसऱ्या आठवड्यात ५ दिवसांत देशात १२९ कोटी रुपये कमावले आहेत. हा आता इतिहासातील कोणत्याही भारतीय चित्रपटाद्वारे तिसऱ्या आठवड्यात केलेली सर्वात चांगली कमाई केली आहे. आता ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे, 'धुरंधर'ची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

image of ranveer singh
Drishyam 3 Ajay Devgn | नव्या कहाणीसह परतला अजय देवगन, 'दृश्यम ३' रिलीज डेट जाहीर

'धुरंधर' ५ डिसेंबर रोजी १९ दिवसांनंतर जगभरातील एकूण कलेक्शन ९०५ कोटी रुपये झाले आहे. 'धुरंधर'मध्ये रणवीरने 'हमजा'ची भूमिका साकारली आहे, जो कराचीच्या टोळी आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसखोरी करणारा एक गुप्तहेर आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरमध्ये अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. धुरंधर रिलीज झाल्यानंतर त्याचा दुसरा भाग मार्च २०२६ मध्ये रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news