

Fifty Shades Darker Director James Foley Death
नवी दिल्ली : हॉलीवूड इंडस्ट्रीतील ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ आणि ‘हाऊस ऑफ कार्ड्स’चे दिग्दर्शक जेम्स फोले यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. ते ब्रेन कॅन्सरने पीडित होते. मीडिया रिपोर्टनुसार, हॉलीवुड रिपोर्टरने जेम्स फोले यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यांनी सांगितले की, जेम्स ब्रेन कॅन्सरशी पीडित होते. त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरु होते.
जेम्स यांचा जन्म १९५३ मध्ये न्यू-यॉर्कमधील ब्रुकलिन येथे झाला होता. १९८४ मध्ये चित्रपट इंडस्ट्री त्यांनी एन्ट्री केली होती. जेम्सने आपल्या करिअरची सुरुवात ‘रेकलेस’ चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्यांनी ‘एट क्लोज रेंज’ची निर्मिती केली होती. हा चित्रपट १९८६ मध्ये रिलीज झाला होता. तसेच प्रेक्षकांनी देखील पसंती दिली होती. यामध्ये सीन पेन आणि क्रिस्टोफर वॉकन मुख्य भूमिकेत दिसले होते.
जेम्स यांनी ‘ग्लेनगॅरी ग्लेन रॉस’ (१९९२), थ्रिलर ‘फियर’ (१९९६), ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ (२०१७) आणि ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ (२०१८) देखील चित्रपट आणि सीरीज आणले. सोबतच टीव्ही सीरीजमध्येही त्यांचे योगदान आहे. त्यांनी ‘हाऊस ऑफ कार्ड्स’, ‘बिलियन्स’ आणि ‘ट्विन पीक्स’ सारखे लोकप्रिय सीरीज बनवल्या होत्या.