Fast And Furious 11: Paul Walker and vin disel
लोकप्रिय फ्रँचाइजी फास्ट अँड फ्यूरियस आगामी पार्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. विशेष म्हणजे हा या फ्रँचाइजीचा शेवटचा पार्ट असणार आहे. त्यामुळे हा सिनेमा अधिक अॅक्शनपॅक्ड आणि थरारक सीन असणार यात शंका नाही. अभिनेता विन डिझेलने कॅलिफोर्निया येथे या सिनेमाची घोषणा केली होती. यावेळी त्याने सिनेमाच्या रिलीज तारखेचीही घोषणाही केली.
यावेळी जमलेल्या गर्दीसोबत सिनेमाची बातमी शेयर करताना विन डिझेल म्हणतो, ‘स्टुडिओने मला सांगितले, विन आपण फास्ट अँड फ्यूरियसचा अटीं सिनेमा एप्रिल 2027मध्ये रिलीज करू शकतो का?’ मी त्यांना उत्तर दिले 3 अटींवरच!’
यानंतर विनने त्यांना तीन अटी सांगितल्या त्यातली पहिली अट म्हणजे, फ्रँचाइजीचा प्लॉट पुन्हा एकदा मधला असावा. दुसरी अट यात कार संस्कृति आणि स्ट्रीट रेसिंगला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देणे, तिसरी अट म्हणजे डॉमिनिक आणि ब्रायन ओ' कॉनर यांची भेट घडवणे.
या सिनेमा ब्रायन ओ' कॉनर ही व्यक्तिरेखा पॉल वॉकरने साकारली होती. पॉलचे 2013 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी झालेल्या अॅक्सिडेंटमध्ये निधन झाले होते. पॉलने फ्रँचाइजीच्या सहा सिनेमांमध्ये काम केले होते. अर्थात विनने पॉलची या सिनेमात कशाप्रकारे वापसी होईल हे मात्र स्पष्ट केले नाही.
सिनेमाच्या सातव्या भागाचे शूटिंग अर्धे झाले असताना पॉलचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नव्या कलाकारासोबत काम करण्यापेक्षा मेकर्सनी पॉलचे डमी आणि त्याच्या भावाची मदत घेत हे शूटिंग पूर्ण केले होते.
यापूर्वीचा सिनेमा फास्ट एक्समध्ये डॉमिनिक टोरेटो आणि टीम जेसन ममोआने साकारलेल्या व्हिलनशी दोन हात करताना दाखवली आहे. या दुसऱ्या पार्टबाबत दिग्दर्शक म्हणतात की हा सिनेमा एक भावनिक करणारे कथानक असू शकते.’ पॉल आगामी सिनेमात दिसू शकतो या जाणिवेने त्याचे फॅन्स आतापासूनच उत्साहात आहेत.