

Amir khan and Amrish Puri Memories
Mumbai: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान त्याच्या सिलेक्टीव्ह सिनेमांच्या निवडीसाठी देखील ओळखली जातो. पण आमीरला त्याच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये चक्क दिवंगत नेते अमरीश पुरी यांचा ओरडा खावा लागला होता. एका मुलाखतीमध्ये आमीरने हा किस्सा शेयर केला होता. पुढे तो म्हणतो, नासिर हुसैन यांच्याकडे मी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरू केले. मुळात आपला मुलगा नजरेसमोर राहावा या हेतूने पालकांनी घेतलेला हा निर्णय होता.
दरम्यान एका सिनेमात ज्येष्ठ दिवंगत अभिनेते अमरीश पुरी होते. माझे एक वैशिष्ट्य आहे की मी दोन दृश्यांमधील सलगता (Continuty) अगदी सहज टिपू शकतो. त्यामुळे अमरीशजींच्या सीन दरम्यान ते सतत लाइन्स विसरत होते. याशिवाय त्या दृश्यात त्यांचा हात फोनवर असणं अपेक्षित होते. पण ते विसरले जात असल्याने चिडचिड करत होते.
त्यावेळी नासिर साहेब आणि ते डायलॉगचा सराव करत होते. ते जेव्हा जेव्हा सीनमधली सलगत विसरायचे मी त्यांना आठवण करून द्यायचो. असे तीन चार वेळेला झाले. पाचव्यांदा मात्र ते माझ्यावर जाम भडकले, आणि म्हणाले 'हा! हा! समजते आहे मला, हात फोनवर हवा, सतत सांगतो आहेस.’
त्यात त्यांचा आवाज म्हणजे जशी एखादी खडखड करणारी मोटरसायकल कशी असते. त्यांच्या त्या जबरदस्त आवाज ते मला रागावले आणि दुसऱ्या सेकंदाला सेटवर एकदम नीरव शांतता पसरली.
मला याचा खूप राग आला आणि वाईटही वाटले. मला असे वाटले की मी एकतर माझे काम करतोय तरी मला रागावले जात आहे.’
पुढे दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या संवाद कौशल्याचे कौतुक करताना आमीर म्हणतो, नासिर साहेब यावेळी माझ्या मदतीला आले. त्यांना महिती होते कलाकार आणि असिस्टंटला न दुखवता कसे काम करून घ्यायचे. ते अमरीशजींना म्हणाले मी माझ्या असिस्टंटला सांगून ठेवले आहे. कलाकाराने कितीही रागावले तरी त्याने त्याचे काम करायचे.
तेव्हा अमरीशजींचा पारा खाली आला आणि ते म्हणाले, अरे सॉरी बेटा.’ आमीरचा सहायक दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा होता. जबरदस्त असे या सिनेमाचे नाव होते. जो 1985 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात संजीव कुमार, जयाप्रदा, सनी देओल, राजीव कपूर, रती अग्निहोत्री आणि अमरीष पुरी होते. दिग्दर्शक नासिर हुसैन यांनी दिग्दर्शित केलेला हा शेवटचा सिनेमा होता.