

The Family Man 3 Actor Rohit Basfore Died
मुंबई : प्राईम व्हिडिओची लोकप्रिय वेब सीरीज 'द फॅमिली मॅन' सीजन ३ फेम अभिनेता रोहित बासफोरचे निधन झाले आहे. तो आसामचा राहणारा होता. नुकताच तो आपल्या गावी गेला होता. त्याचा मृतदेह आसाममधील एका धबधब्याजवळ आढळल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी मित्रांकडून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
‘द फॅमिली मॅन’ सीझन ३ मध्ये रोहित बासफोरने दमदार भूमिका साकारली होती. ही प्राईम व्हिडिओची प्रसिद्ध वेब सीरीज होती.
रविवारी सायंकाळी तो मित्रांसमवेत आसाममधील गर्भंगा जंगलात फिरायला गेला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह मिळाला. त्याच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. तसेच त्याच्या शरीरावर जखमांचे निशाण मिळाले आहेत. आता पोलिसया प्रकरणाचा तपास करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिवस संपल्यानंतरही रोहित बासफोरचा संपर्क न झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना चिंता लागून राहिली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला. त्याच्या एका मित्राने त्यांना या दुर्घटनेची माहिती दिली. पुढे कुटुंबीयांना तो जंगलात सापडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टर्सनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनामध्ये त्याच्या शरीरावर अनेक जखमांचे निशाण असल्याचे उघड झाले. डोके, चेहरा, अन्य भागांवर जखमा आहेत.
रोहितच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रोहितच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, अलिकडेच रोहितचा पार्किंगवरून वाद झाला होता. या वादात तिघे जण होते. शिवाय एक जिम मालकदेखील असल्याचे म्हटले. यानेच रोहितला ट्रिपसाठी बोलावलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, हे चौघे जण सध्या फरार आहेत.
‘द फॅमिली मॅन’मध्ये बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयीने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या निधनानंतर मनोज बाजपेयीने सोशल मीडिया सहकलाकार रोहितच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. मनोज बाजपेयीने ट्विटमध्ये लिहिलं, ‘परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो रोहित बसफोर!! खूप लवकर गेला! परिवारा प्रति आमच्या संवेदना!! ओम शांती!!!’