पुढारी ऑनलाईन : कोणत्याही वेब सीरीज वा चित्रपट दिग्दर्शकाचा क्रिएटिव्ह ॲप्रोच, प्रेक्षकांना आवडणारे पात्र, भूमिका आणि कलाकारांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री आणि त्या कहाणीचा अनोखा शेवट, त्या वेबसीरिजला सर्वोत्कृष्ट बनवतो. आम्ही असेच काही टॉप ५ वेब सीरीजविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्या वेबसीरिज रोमँटिक आहेत. रोमान्सने भरपूर या सीरिजवर टाकूया एक नजर.
वेब सीरीजमध्ये रचलेल्या प्रेम कहाणीच्या सुगंधाने आणखी रोमँटिक वातावरण नक्कीच निर्माण होईल. एखाद्या वेबसीरिजमध्ये तुम्हाला प्रेम आणि संगीतामधील वेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळेल, तर एखाद्या सीरिजमध्ये एकमेकांच्या अगदी विरुध्द असणाऱ्या प्रेयसी-प्रियकराची कहाणी मिळेल. तसं पाहिलं तर वेब सीरीज कोणत्याही बॅनरची असो, जर त्या सीरिजची कहाणी अनोखी आणि इंटरेस्टिंग असेल तर, प्रेक्षकांना ती शेवटपर्यंत खिळवून ठेवतेच. रोमांटिक वेब सीरिजच्य़ा कहाण्यांमध्ये थ्रिलर, वास्तविकता आणि नाविन्यता असणं अनिवार्य आहे. कारण, २१ व्या शतकातील प्रेक्षकांसमोर रोमान्स करण्याचं एक नवं रूप सादर करणं आव्हानात्मक आहे.
१. बंदिश बँडिट्स (Bandish Bandits)
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर बंदिश बँडिट्स ही वेबसीरिज तुम्ही पाहू शकता. ऋत्विक भौमिक, श्रेया चौधरी, नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, शीबा चड्ढा, कुणाल रॉय कपूर आणि राजेश तैलंग या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक – अमृतपाल सिंह बिंद्रा आणि आनंद तिवारी हे आहेत. या प्रेम कहाणीमध्ये रोमँटिक म्युझिकल ड्रामा आहे. या सीरीजमध्ये दोन वेगवेगळ्या स्वभावाचे तरुण-तरुणीची कहाणी दाखवण्यात आली आहे. त्यांची स्वप्ने आणि इच्छा-महत्वाकांक्षा अगदी वेगळ्या आहेत.परंतु, संगीताच्या माध्यमातून झालेल्या भेटीचे रुपांतर प्रेमात होते, हे दोघांनाही समजत नाही. ही एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे.
२. बारिश – सीजन १ आणि २
ऑल्ट बालाजी आणि जी5 वर ही सीरिज पाहू शकता. यामध्ये शरमन जोशी, आशा नेगी, प्रिया बनर्जी, बेनाफ पटेल, साहिल श्रॉफ, शुभांगी लाटकर आणि विक्रम सिंह चौहान यांच्या भूमिका आहेत. बलजीत सिंह चड्ढा हे या सीरिजचे दिग्दर्शक होते. ही एक प्रेम कहाणी होती.
श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी इतकी मोठी असते की, त्यांच्यातील प्रेम कहाणी नेहमी प्रेक्षकांना हवीहवीशी असते. एक गरीब तरुणीशी एका बिजनेसमॅनला प्रेम होतं. तिच्याशी तो लग्न करतो. पण, यादरम्यान, दोघांना खूप संघर्ष करावा लागतो. या रोमॅटिक वेब सीरिजमध्ये कुटुंब, प्रेम आणि नात्यांते अर्थ खूप चांगल्या पध्दतीने समजवण्यात आले आहेत.
३. इश्क में मरजावां २
जी 5 आणि वूट सिलेक्टवर ही वेबसीरिज पाहू शकता. रवि दुबे, निया शर्मा, विन राणा, सुधांशु पांडे, वरुण जैन आणि संजय स्वराज यांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. नोएल स्मिथ दिग्दर्शित ही वेबसीरिज आहे.
छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी टीव्ही मालिका इश्क में मरजावां आधीपासून प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. परंतु, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वाढता प्रेक्षक पाहून ही सीरिज वूट सिलेक्टवर रिलीज करण्यात आला आहे. जर तुम्हाला प्रेम आणि पॅशनसोबत ड्रामा पाहायचा असेल, तर ही आपल्यासाठी उत्कृष्ट वेब सीरीज आहे.
४. कर ले तू भी मोहब्बत सीजन १, २ आणि ३
ऑल्ट बालाजीवर ही वेब सीरिज पाहू शकता. राम कपूर, साक्षी तंवर, हितेन तेजवानी, करिश्मा तन्ना हे या सीरिजमध्ये मुख्य कलाकार आहेत. एकता कपूर दिग्दर्शित ही सीरिज एक प्रेम कहाणी आहे.
कर ले तू भी मोहब्बत वेब सीरीज ओल्ड स्कूलवाली एक लव्ह स्टोरी आहे आणि या लव्ह स्टोरीची खासियत म्हणजे ही जुनी वाटत नाही. ही कहाणी वयस्कर जोडीची आहे. प्रेम करण्याचं वय निघून गेलेल्या या जोडीचे प्रेम शेवटपर्यंत कसं अबाधित राहतं, याचं चित्रण यामध्ये दाखवण्यात आलं आहे.
५. लिटिल थिंग्ज
नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहता येईल. मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल हे कलाकार या सीरिजमध्ये दिसणार आहेत. ही सीरिजचे अजय भुयन आणि रुचिर अरुन दिग्दर्शक आहेत. आजकाल लिव्ह इन रिलेशनशीप एक फॅशन बनले आहे. जे लोक या नात्याकडे पाहतात, त्यांना वाटतं की, हे सर्वकाही चांगलं आहे. पण, त्यांना माहिती नसतं की, दोघांमधील प्रेम, अडचणी कशा असतात. प्रेम, थोडं तू-तू मैं मैं आणि भांडण या वेब सीरीजच्या क्यूट लव्ह स्टोरीमध्ये दाखवण्यात आलं आहे.