धर्मवीर, महाराष्ट्र शाहिरनंतर दुष्यंत वाघ शिक्षकाच्या भूमिकेत

दुष्यंत वाघ
दुष्यंत वाघ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मिलीमीटर अब सेंटीमीटर जो बन गया है" हा जगप्रसिद्ध संवाद तुम्हाला आठवत असेलच, अर्थात हा सिनेमा होता,"थ्री ईडियट". या सिनेमात मिलीमीटरच्या भूमिकेतला मराठमोळा अभिनेता दुष्यंत वाघ आता मराठी सिनेमात लक्ष्यवेधी भूमिकांमध्ये दिसून येतो आहे. "धर्मवीर" सिनेमा पाठोपाठ "महाराष्ट्र शाहीर" सिनेमातील बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेला दुष्यंत वाघ लवकरच "शिष्यवृत्ती" या मराठी सिनेमातून मध्यवर्ती भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

"साज एंटरटेनमेंट" निर्मित, अखिल देसाई लिखित आणि दिग्दर्शित शिष्यवृत्ती या सिनेमात दुष्यंत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल दुष्यंत म्हणाला, मध्यवर्ती भूमिका असलेला हा माझा पहिलाच चित्रपट असणार आहे. अखिल देसाई यांनी मला जेव्हा या सिनेमाची गोष्ट ऐकवली होती, तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला होता. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं म्हणत असतांना, मिळालेली शिष्यवृत्ती नाकारून स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर पुढे जाणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. आशय मला आवडल्यानेच चित्रपटाला मी होकार दिला. शिवाय यात मला यात मध्यवर्ती भूमिका साकारण्याची संधी मिळणार होती.

दुष्यंत पुढे सांगतो की, नशिबाने आजवर मी केलेल्या भूमिकांमध्ये मला गेटअपसाठी जास्त महत्व द्यावे लागले होते. थ्री इडिय मध्ये मी नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला तरुण होतो, धर्मवीरमध्ये दिघे साहेबांच्या तरुण काळातला मित्र होतो, तर महाराष्ट्र शाहिरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तरुणपणातील भूमिका होती. आता शिष्यवृत्ती सिनेमात मी जबाबदार शिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे.

यासाठी देखील माझा वेगळा गेटअप आहे. लवकरच तो तुमच्यासमोर येणार आहेच. जून महिन्यात शिष्यवृत्ती सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात माझ्या सोबत कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस, अंशूमन विचारे या कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका असून रुद्र ढोरे प्रमुख बालकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news