Cannes : ऐश्वर्यासोबत कान्सला आराध्याही गेली, विमानतळावरून व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Cannes : ऐश्वर्यासोबत कान्सला आराध्याही गेली, विमानतळावरून व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : कान्स चित्रपट महोत्सव १६ मे २०२३ रोजी सुरु झाला आहे. (Cannes) या महोत्सवात तमाम भारतीय सेलिब्रिटीमध्ये बच्चन परिवाराची सून, ऐश्वर्या राय बच्चन ही देखील सहभागी झाली. यंदा ती तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत कान्सला रवाना झालीय. ऐश्वर्या-आराध्याचा विमानतळावरून व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या दोघी कान्ससाठी रवाना झाल्या आहेत. (Cannes)

यंदाही ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर दिसणार आहे. यावेळी तिचा आउटफिट कसा असेव, ती कोणती ॲक्सेसरीज परिधान करणार, याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण, फॅन्सना याविषयीचा उत्सुकता लागून राहिलीय. ऐश्वर्या शिवाय सारा अली खान, ईशा गुप्ता, उर्वशी रौतेला, अनुष्का शर्मा मानुषी छिल्लर सहभागी असतील.

व्हिडिओमध्ये दिसत की, मुंबई विमानतळावरून रात्री उशीरा ऐश्वर्या राय बच्चन आराध्या सोबत दिसत आहे. त्या कान्ससाठी रवाना झाल्या. विमानतळावर अभिनेत्री ऐश्वर्या ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसली. तर आराध्या कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button