Drishyam 3 Box Office: इतिहास रचला! अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवर जलवा; ‘दृश्यम 3’ने तीन दिवसांत किती कोटी कमावले?

Drishyam 3 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ने पहिल्याच वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे.
Drishyam 3 Box Office Collection
Drishyam 3 Box Office CollectionPudhari
Published on: 
Updated on: 

Drishyam 3 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या वीकेंडमध्येच चित्रपटाने मोठी कमाई केली आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 62 कोटी रुपयांची नेट कमाई करत 2026 मधील दुसरी सर्वात मोठी हिंदी ओपनिंग मिळवली. ही अजय देवगणच्या सुमारे 35 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. शनिवारीही चित्रपटाने 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.

रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, रविवारी ‘दृश्यम 3’ने सुमारे 61 कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यामुळे तीन दिवसांत चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन 176.50 कोटी रुपये झाले आहे. रविवारी चित्रपटाची सरासरी ऑक्युपन्सी सुमारे 56 टक्के होती.

जागतिक स्तरावरही चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. तीन दिवसांत ‘दृश्यम 3’ची वर्ल्डवाइड कमाई 272.80 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे पहिल्याच वीकेंडमध्ये हा चित्रपट 300 कोटींच्या जवळ पोहोचला आहे.

बॉलिवूडमधील पहिल्या वीकेंडच्या कमाईचा विचार केला तर ‘दृश्यम 3’ने मोठी मजल मारली आहे. या यादीत रणवीर सिंहचा ‘धुरंधर द रिवेंज’ आणि शाहरुख खानचे ‘जवान’ व ‘पठाण’ हे चित्रपट आघाडीवर आहेत.

Drishyam 3 Box Office Collection
Tom Cruise Digger| अंहकारी, सनकी म्हातारा ‘टॉम क्रुझ’ : ‘डिगर’ मुव्हीमधील अवतार पाहून फॅन्सही अचंबित!

सोमवारची कमाई ठरणार महत्त्वाची

आता ‘दृश्यम 3’साठी सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. वीकेंडनंतरचा दिवस सुरू झाल्याने चित्रपटांच्या कमाईत साधारणपणे घट होते. मात्र, सोमवारीही चित्रपटाने कमाईचा वेग कायम ठेवला आणि चार दिवसांत भारतात 200 कोटी रुपयांचा नेट टप्पा पार केला, तर चित्रपट नवीन विक्रम करु शकतो.

Drishyam 3 Box Office Collection
Drishyam 3 Review: ‘दृश्यम 3’ पाहावा की नाही? अजय देवगणच्या चित्रपटातील थरार, अभिनय अन् क्लायमॅक्स कसा आहे?

अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ने पहिल्या तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवली आहे. आता सोमवारच्या कमाईनंतर हा चित्रपट पुढे किती मोठा पल्ला गाठतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news