Tom Cruise Digger| अंहकारी, सनकी म्हातारा ‘टॉम क्रुझ’ : ‘डिगर’ मुव्हीमधील अवतार पाहून फॅन्सही अचंबित!

राजकीय कथेतून हवामान संकटावर भाष्य, ऑस्कर विजेते दिग्दर्शक अलेजांद्रो गोंजालेझ इनारितु यांची कमाल
Tom Cruise
Tom Cruise
Published on: 
Updated on: 

Tom Cruise Digger Movie टॉम क्रुझच जगभरात चाहते आहेत ६० वर्षे वय असूनही तिशीतील तरुणांनाही लाजवेल अशी त्‍याची पर्सनॅलिटीचे अनेक दिवाने आहेत. मिशन इंम्पासिबल ते टॉप गन सारख्या ॲक्शन चित्रपटात त्‍याने अनेक भूमिका अजरामर आहेत. ॲक्शन स्टार म्हणून त्‍यांची जगभरात ओळख आहे. स्वताचे स्टंस्ट स्वता करण्याचे धाडस टॉम क्रूझ करतो. अशा या ‘स्टार’ला पहिल्यांच ॲक्टर म्हणून एका म्हाताऱ्या अब्जाधिशाच्या भूमिकेत पाहणे त्‍याच्या चाहत्‍यांसाठी आश्चर्याचे आहे. पण दिग्दर्शक अलेजांद्रो गोंजालेझ इनारितु यांनी ही कमाल केली आहे.

२ ऑक्टोबर रोजी डिगर ही इनारितू यांची मुव्ही जगभरात प्रदर्शित झाली. टॉम याच्या चाहत्‍यांना त्‍याच्या या चित्रपटाची उत्‍सूकता होती. स्टार असलेला देखणा टॉम या चित्रपटा म्हाताऱ्या माणसाची भूमिका करणार याची चर्चा होती. कॅनेडियन दिग्ददर्शक अलेजांद्रो गोंजालेझ इनारितु यांनी त्‍यांच्या बर्डमन, रेव्हनंट सारखेच या चित्रपटाच्या मुख्य नायकाला अस्सल अवतारात उभा केला आहे.

कोण आहेत अलेजांद्रो गोंजालेझ इनारितु

दिग्दर्शक अलेजांद्रो गोंजालेझ इनारितु यांच्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. ‘बर्डमॅन’ आणि ‘द रेव्हेनंट’सारख्या चित्रपटांसाठी ऑस्कर विजेते ठरलेले इनारितु त्यांच्या वेगळ्या आणि प्रयोगशील सिनेमॅटिक शैलीसाठी ओळखले जातात. गंभीर, गुंतागुंतीचे आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे विषय मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. ‘डिगर’मध्येही त्यांनी अशीच वेगळी मांडणी केली आहे. विशेष म्हणजे, अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या टॉम क्रूजला त्यांनी एका अहंकारी, सनकी आणि वयस्कर अब्जाधीशाच्या भूमिकेत सादर केले आहे. त्यामुळे टॉम क्रूजचा हा अवतार प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळा अनुभव ठरतो.

‘डिगर’ची कथा काय

चित्रपटाची कथा डिगर रॉकवेल नावाच्या एका श्रीमंत आणि प्रभावशाली ऑइल टायकूनभोवती फिरते. टॉम क्रूजने ही भूमिका साकारली आहे. प्रचंड संपत्ती आणि सत्ता असूनही डिगरला स्वतःच्या बुद्धिमत्तेचा काहीसा अतिविश्वास असतो. जगातील कोणतीही समस्या आपण सोडवू शकतो, असा त्याचा ठाम विश्वास असतो. मात्र, ग्रीनलँडमध्ये घेतलेल्या त्याच्या काही बेफिकीर निर्णयांमुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. त्याचा परिणाम उत्तरी युरोपमध्ये मोठ्या पर्यावरणीय संकटाच्या रूपात होण्याची शक्यता निर्माण होते. आता स्वतःच्या निर्णयांमुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्याची वेळ डिगरवर येते.डिगर आपल्या कंपनीतील हवामान तज्ज्ञ डॉ. गणेशची, तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मदत घेतो. जगाच्या नजरेत स्वतःला मानवतेचा तारणहार म्हणून सादर करण्याची त्याची धडपड सुरू होते. मात्र, त्यानेच निर्माण केलेले पर्यावरणीय संकट तो वेळ संपण्यापूर्वी रोखू शकेल का, हा चित्रपटातील मुख्य प्रश्न आहे.

जीवाश्म इंधन, हवामान बदल, आर्थिक सत्ता आणि राजकीय दबदबा यांसारख्या गंभीर मुद्द्यांना इनारितु यांनी उपरोधात्मक पद्धतीने मांडले आहे. अमेरिकेच्या धोरणांवरही चित्रपटातून अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटाची संकल्पना निश्चितच धाडसी आहे.‘डिगर’ची तांत्रिक बाजूही भक्कम आहे. इमॅन्युएल ल्युबेझ्की यांच्या सिनेमॅटोग्राफीमुळे चित्रपटाला भव्य आणि वेगळा लूक मिळतो. प्रोडक्शन डिझाइनही या जगाला अधिक प्रभावी बनवते.

टॉम क्रूजचा वेगळाच अवतार

‘डिगर’मध्ये टॉम क्रूज सुरुवातीपासून शेवटपर्यंत केंद्रस्थानी आहेत. अॅक्शन हिरोची नेहमीची प्रतिमा बाजूला ठेवून त्यांनी अहंकारी, विचित्र आणि सनकी वयस्कर अब्जाधीशाची भूमिका साकारली आहे. बॉडी लँग्वेज, संवादफेक आणि हावभाव यांच्या माध्यमातून त्यांनी डिगरच्या व्यक्तिरेखेला वेगळे आयाम दिले आहेत. अॅक्शनमध्ये धावणाऱ्या टॉम क्रूजला पाहण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांना त्यांचा हा वेगळा अवतार सुरुवातीला काहीसा खटकू शकतो. मात्र, याच भूमिकेत ते केवळ स्टार म्हणून नव्हे, तर अभिनेता म्हणूनही प्रभाव पाडताना दिसतात.त्यांचा प्रोस्थेटिक लूकही चित्रपटाच्या चर्चेतील महत्त्वाचा भाग ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news