Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पठाण, अ‍ॅनिमल आणि धुरंधरला टाकलं मागे, किती कोटी कमावले?

Drishyam 3 Box Office: भारत आणि परदेशातील मिळून चित्रपटाने पहिल्या दिवशी 95.10 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.
Drishyam 3 Box Office History
Drishyam 3 Box Office History Pudhari
Published on: 
Updated on: 

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. ‘दृश्यम 3’ने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली. अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, भारतातील ग्रॉस कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटाने ‘पठाण’, ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘धुरंधर’सारख्या मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकल्याचा दावा केला जात आहे.

‘दृश्यम 3’ची पहिल्या दिवशी किती कमाई?

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘दृश्यम 3’ने पहिल्या दिवशी भारतात 66.75 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन 80.10 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

परदेशातील कमाईचाही चित्रपटाला चांगला फायदा झाला आहे. ‘दृश्यम 3’ने ओव्हरसीजमध्ये सुमारे 15 कोटी रुपयांची कमाई केल्याचे आकडे समोर आले आहेत. भारतातील ग्रॉस आणि ओव्हरसीज कलेक्शन मिळून चित्रपटाची पहिल्या दिवसाची एकूण जगभरातील कमाई 95.10 कोटी रुपये झाली आहे. या आकड्यामुळे ‘दृश्यम 3’ने पहिल्याच दिवशी 100 कोटींच्या जवळपास मजल मारली आहे.

‘पठाण’ आणि ‘अ‍ॅनिमल’लाही टाकलं मागे

‘दृश्यम 3’च्या पहिल्या दिवसाच्या ग्रॉस कलेक्शनची तुलना अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांशी केली जात आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने भारतात पहिल्या दिवशी सुमारे 65.96 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले होते.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे 76.10 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केल्याचे आकडे आहेत. तर ‘धुरंधर’चे भारतातील पहिल्या दिवसाचे ग्रॉस कलेक्शन 33.60 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

या तुलनेत ‘दृश्यम 3’ने भारतात 80.10 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन करत या चित्रपटांना मागे टाकल्याचे आकडे समोर आले आहेत.

Drishyam 3 Box Office History
Drishyam 3 Review: ‘दृश्यम 3’ पाहावा की नाही? अजय देवगणच्या चित्रपटातील थरार, अभिनय अन् क्लायमॅक्स कसा आहे?

अजय देवगणच्या कारकिर्दीतील मोठी ओपनिंग

‘दृश्यम 3’च्या कमाईमुळे अजय देवगणच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीतील हा नवा आहे. पहिल्याच दिवशी एवढी मोठी कमाई करणारा हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

Drishyam 3 Box Office History
Rise & Fall: कोण आहे ही अभिनेत्री? क्रिकेटर्सही आहेत फिदा; वीरेंद्र सेहवागसमोर केला मोठा खुलासा

आता चित्रपटाची खरी परीक्षा वीकेंडमध्ये होणार आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद कायम राहिला, तर शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘दृश्यम 3’ वीकेंडमध्ये कोणते नवे विक्रम करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news