घटस्फोटाच्या चर्चेला गती, ऐश्वर्या रायच्या फॅमिली पार्टीमध्ये अभिषेक बच्चन मिसिंग

Aishwarya Rai Divorce | ऐश्वर्याच्या फॅमिली पार्टीमध्ये अभिषेक बच्चन न दिसल्याने घटस्फोटाच्या चर्चेला जोर
Aishwarya Rai
ऐश्वर्याच्या फॅमिली पार्टीमध्ये अभिषेक बच्चन दिसला नाहीinstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐश्वर्या रायच्या फॅमिलीमध्ये एक पार्टी झाली, त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अभिषेक बच्चन न दिसल्याने ॲश-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेला गती पकडली आहे. फॅमिली पार्टीमध्ये ॲश मुलगी आराध्यासोबत दिसली. अभिषेक मुंबई असतानाही या पार्टीमध्ये दिसला नाही. (Aishwarya Rai)

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांचे खासगी जीवन खूप दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या कपलच्या घटस्फोटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता अभिषेक हा ऐश्वर्या - आराध्या सोबत दिसत नाही. आता ऐश्वर्याच्या फॅमिलीमध्ये एक बर्थडे पार्टी होती., यामध्येही अभिषेक दिसला नाही. बर्थडे पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या फॅमिली सोबत पोज देताना दिसतेय. (Aishwarya Rai)

अभिषेक नुकताच परतला मुंबईत

अभिषेक बच्चन चित्रपट हाऊसफुल ५ चे शेड्यूल पूर्ण करून मुंबईला वापस परतला आहे. त्याला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. मुंबईमध्ये असतानाही अभिषेक या पार्टीचा हिस्सा बनला नाही. याच कारणाने सोशल मीडिया युजर्स सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कपलची एक मुलगी आराध्या बच्चन देखील आहे. त्यांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर येत होते. जेव्हा ऐश्वर्याने बच्चन परिवार सोबतच नाही तर मुलगी आराध्या सोबत अंबानी वेडिंगमध्ये एन्ट्री केली होती. तेव्हा अभिषेकने दुसऱ्या व्यक्तीच्या इन्स्टाग्रामवरील एक घटस्फोटसंबंधित असणारी पोस्ट लाईक केली होती. त्यामळे हे कपल वेगळे होणार असल्याची चर्चा झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news