

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांची थरारक आणि रहस्यमय कथेवर आधारित असणारी 'द ट्रॅप' (The Trap ) ही वेबसीरीज लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. शहरांमध्ये नाईट लाईफ ही संस्कृती सध्या मोठ्या प्रमाणात तरुणाईला भुरळ घालत असून यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. याच नाईट लाईफमध्ये पबिंग, पार्टी आणि मौज मस्ती ही तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. याचं नाईट लाईफच्या संस्कृतीच्या चक्रव्युहात एक तरुणी कशी अडकते. ती कशी ट्रॅप होते. हे या वेबसीरीजमध्ये रसिकांना पहायला मिळणार आहे. थरारक आणि रहस्यमय असणारी ही वेब सिरीज लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. (The Trap )
'द डार्क शाडो मोशन पिक्चर्स' या प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री जानकी आर, रामकुमार शेडगे, केतन पेंडसे, अमोल भगत असे अनेक कलाकारांचा अभिनय रसिकांना पहायला मिळेल. या सीरीजचे कॅमेरामन आकाश भापकर यांनी केले आहे. तर लेखन – दिग्दर्शक रामकुमार शेडगे हे आहेत. द ट्रॅप' वेब सीरीजला वेस्ट बंगाल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लाईव्ह ॲक्शन' कॅटेगरीमध्ये बेस्ट डायरेक्टर म्हणून दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांना पुरस्कार मिळाला आहे.
विविध चित्रपट महोत्सवात द ट्रॅप वेब सीरीज रसिकांच्या व ज्युरींच्या उतरली आहे. त्यामुळे या वेब सीरीजची उत्सुकता जनसामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या अगोदर रामकुमार शेडगे यांनी अ.ब.क या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यामध्ये प्रसिद्ध कलाकार सुनील शेट्टी, तमन्ना भाटिया असे हिंदीतील दिग्गज कलाकार होते. तर अनेक चित्रपट महोत्सवात चित्रपटाला पुरस्कार मिळाले होते. द ट्रॅप ही वेब सीरीज रसिकांना आवडेल असे रामकुमार शेडगे यांनी संगितले.