

रिंकू राजगुरुच्या ‘आशा’ या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एका संघर्षमय तरुणीची भावनिक कथा दाखवणारा हा टीझर रिंकूच्या नैसर्गिक अभिनयामुळे विशेष उठून दिसतो. रिलीज डेट जाहीर झाली नसली तरी चित्रपटाबद्दल उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
Rinku Rajaguru Asha Teaser out
मुंबई - रिंकू राजगुरुने आपल्या दमदार अभिनयाने ‘सैराट’पासूनच प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. आता तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तिच्या आगामी मराठी चित्रपटाचा ‘आशा’ असा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या टीझरमध्ये रिंकूचा एक नवा अवतार पाहायला मिळत आहे.
‘आशा’ या चित्रपटात एका साध्या मुलीची संघर्षमय कहाणी दाखवण्यात आली असून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांमुळे तिच्या जगण्याची दिशा कशी बदलते, याची झलक टीझरमधून मिळते. एका क्षणी निरागस वाटणारी रिंकू पुढच्या क्षणी गंभीर भावनेने भारलेली दिसते. तिच्या या अभिनयातील विविध पैलू टीझरमध्ये स्पष्टपणे जाणवतात.
''बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशी चित्रपटाची टॅगलाईन आहे. यावेळी चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ डिसेंबरला ‘आशा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाला ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवले आहेत.
'हे' असतील कलाकार
या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
रिंकूने साकारलीय ही भूमिका
रिंकू एका 'आशा'च्या भूमिकेत दिसतेय. ती फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नाहिये तर प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी आशा आहे.
काय म्हणाले दिग्दर्शक दिपक पाटील?
‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे.’’
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओज अंतर्गत हा चित्रपट रिलीज होणार आहे.