

suhas joshi role in Khotachi wadi
मुंबई : 'मुंज्या'सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर आता मराठीत पुन्हा एकदा हॉररची लाट येतेय की काय...? अशी चर्चा रंगू लागली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या अल्ट्रा झकास ओरीजिनल्सच्या 'खोताची वाडी'च्या सेटवर दिसल्या आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांचं लक्ष तिकडे वळलं आहे. गंभीर चेहऱ्यानं त्या नदीकिनारी उभ्या असलेल्या त्यांच्या फोटोने एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे.
आता वेब सिरीजमध्ये त्यांची भूमिका नेमकी काय आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण 'मुंज्या'नंतर मराठी हॉररमध्ये सुहास जोशी यांना पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे!
खोताची वाडी म्हणजे नक्की काय? ही जागा खरी आहे का? इथे काही भीषण घटना घडली होती का? की ही जागा खास या वेब सिरीजसाठी तयार केली आहे का? अशाच अनेक प्रश्नांनी प्रेक्षकांचं कुतूहल वाढवलं असून हि वेब सिरीज लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.
राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारी ही नवीन वेब सिरीज त्यांच्या सिनेमॅटिक शैलीसाठी ओळखला जाणारा एक प्रोजेक्ट ठरणार आहे. ही वेब सिरीज केवळ मनोरंजनापुरती नसेल, तर प्रेक्षकांसाठी एक नवा रोमांचक अनुभव असेल.