

Dhurandhar Movie Mistakes Review Ranveer Singh: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 27 कोटींचा गल्ला जमवला, पण अनेक प्रेक्षकांना चित्रपटात काही चुका जाणवल्या. 3 तास 34 मिनिटांच्या या स्पाय-थ्रिलरमध्ये भरपूर अॅक्शन आणि दमदार कलाकार असूनही काही गोष्टींमुळे प्रेक्षकांचा मूड बिघडला आहे.
चित्रपटाची सुरुवात कंधार हायजॅक सीनने होते. या सीनमध्ये अजय सान्याल प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे आश्वासन देतो. पण हा सीन खूप लांबवला आहे. या सीनची चित्रपटात फारशी गरज नव्हती. हा सीन थोडक्यात दाखवला असता तर कथानक अधिक संक्षिप्त आणि प्रभावी झाले असते.
रणवीरचे पात्र ‘धुरंधर’ याला पाकिस्तानातील कराची-ल्यारी येथे ऑपरेशनसाठी पाठवले जाते. पण कथानक जसजसे पुढे जाते, तस तसा भारत-पाक संघर्षाचा मुख्य भाग कमी होत जातो. यात पाकिस्तानी राजकारण, गँगस्टर आणि पोलिस यांच्यातील सीनमध्ये जास्त वेळ जातो. कथानक भरकटू नये म्हणून संसद हल्ला आणि 26/11 यांचा उल्लेख केला आहे, पण तरीही मूळ मिशनचा प्रभाव जास्त जाणवत नाही.
ट्रेलरमध्ये अर्जुन रामपाल म्हणजेच मेजर इक्बाल खूप धोकादायक आहे असं दाखवलं होतं, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु चित्रपटात त्याला अत्यंत कमी स्क्रीन टाइम मिळाला आहे. त्याचे पात्र कथानकात महत्त्वाचे असूनही ते जवळपास कुठेच दिसत नाही. मुंबई ब्लास्टशी त्याचा संबंध थोडक्यात दाखवला आहे.
चित्रपटात भरपूर अॅक्शन असले तरी ‘Uri’ सारखा प्रभाव किंवा ANIMALसारखे व्हिज्युअल इम्पॅक्ट कुठेच दिसत नाही. चित्रपटाचा 3 तास 34 मिनिटांचा रनटाइम अनेक प्रेक्षकांना त्रासदायक वाटतो. अॅक्शन आहे, कथा आहे, पण काहीतरी मिस झाल आहे असं वाटत राहतं.
चित्रपटात काही सीन्समध्ये लॉजिकच नाही. उदा. अक्षय खन्नाला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर रणवीर जखमी असतो, पण त्याच्यावर कोणतेही उपचार होत नाहीत. तो तासंतास तसाच बसून राहतो आणि मग घरीही तसाच पोहोचतो. सारा अर्जुन त्याच्या जखमा पाहण्यापेक्षा त्याला खायला घालताना जास्त दाखवली आहे. दुसरं उदाहरण म्हणजे मुंबई हल्ल्यानंतर प्रमुख अधिकारी रणवीरच्या चेहऱ्यावरचे भाव लक्षात घेत नाहीत. अशा अनेक विसंगती या चित्रपटात आहेत. अनेकांना आशा आहे की Part 2 मध्ये या चुका होणार नाहीत.